यंदा १३ लाख पुस्तकांचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:51 IST2019-05-20T12:51:05+5:302019-05-20T12:51:25+5:30
नंदुरबार : समग्र शिक्षा अभियान २०१९-२०२० मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात १३ लाख ४६७ पुस्तकांचा पुरवठा ...

यंदा १३ लाख पुस्तकांचा पुरवठा
नंदुरबार : समग्र शिक्षा अभियान २०१९-२०२० मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यात १३ लाख ४६७ पुस्तकांचा पुरवठा नाशिक येथील बालभारतीच्या विभागीय कार्यालयाकडून करण्यात येणार आहे़ आतापर्यंत केवळ तळोदा व धडगाव तालुक्यांनाा १ लाख ३६ हजार ८९ पुस्तकांचा पुरवठा करण्यात आलाय़
दरम्यान, १७ जून रोजी उन्हाळी सुट्यांनंतर प्राथमिक शाळांच्या सत्रांना सुरुवात होणार आहे़ त्या आधी म्हणजे ५ जूनपर्यंत सर्व तालुक्यांना मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार असल्याचा दावा प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे़ ५ जूनला सर्व तालुक्यांना पुस्तके प्राप्त होऊन त्यानंतरच्या आठवड्यात संबंधित केंद्र प्रमुखांना पुस्तकांचे वाटप करुन ते शाळानिहाय विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील पहिली ते आठवीच्या एकूण ५१ हजार ७१ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी २ लाख ८७ हजार १९७ पुस्तकांचे नियोजन आहे़ नवापूर तालुक्यातील पहिली ते आठवीच्या एकूण ३२ हजार १४७ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी १ लाख ७९ हजार १८८ पुस्तकांचे नियोजन आहे़ शहदा तालुक्यातील पहिली ते आठवीच्या एकूण ५९ हजार २५८ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी ३ लाख ३१ २३२ पुस्तकांचे नियोजन आहे़ तळोदा तालुक्यातील पहिली ते आठवीच्या २३ हजार लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी १ लाख २७ हजार ९७६ पुस्तकांचे नियोजन आहे़ अक्कलकुवा तालुक्यासाठी पहिली ते आठवीच्या ३८ हजार १६९ लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी २ लाख ९ हजार २९२ पुस्तकांचे नियोजन आहे़ तर धडगाव तालुक्यातील ३० हजार ८०० लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी १ लाख ६५ हजार ५८२ पुस्तकांचे नियोजन आहे़ अशा प्रकारे एकूण २ लाख ३४ हजार ४४७ विद्यार्थ्यांसाठी १३ लाख ४६७ पुस्तकांचे नियोजन प्राथमिक शिक्षणविभागाकडून करण्यात आले आहे़ अद्याप तळोदा व धडगाव तालुक्याला पुस्तकांचा पुरवठा झाला आहे़