शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

दांडिया व गरबांविना यंदा सुनासुना राहणार नवरात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:39 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. सार्वजनीक गरबा, दांडिया यांना यंदा फाटा देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. सार्वजनीक गरबा, दांडिया यांना यंदा फाटा देण्यात येत आहे. नंदुरबारातील खोडाईमाता यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. मंदीरात दर्शनासाठी विविध नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नवरात्रोत्सवात नऊ दिवस मातेचा जागर आणि गरबा-दांडिया यांची रेलचेल असते. यासाठी विविध मंडळे चौकाचौकात दांडियाचे आयोजन करीत असतात. त्यासाठी तरुण, तरुणींमध्ये विशेष उत्साह असतो. यंदा मात्र कोरोनामुळे सर्वांच्याच उत्सहावर पाणी फेरले आहे. गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सव देखील साधेपणाने व गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सार्वजिनक दुर्गोत्सवाची संख्या अगदीच कमी असते. केवळ रात्री चौकात गरबा, दांडिया खेळला जात असतो. घरगुती स्वरूपात देखील मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाण्याचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे नंदुरबारात मूर्ती बनविणारे देखील एक, दोनच कारागिर आहेत. त्यांच्याकडील मूर्तींना देखील यंदा अपेक्षीत मागणी राहिली नसल्याचे चित्र होते. नंदुरबारातील खोडाईमाता, वाघेश्वरी देवी तसेच शहाद्यातील अंबाजी, सप्तशृंगी मंदीर या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होते. नंदुरबारात यात्राही भरते. यंदा या यात्रोत्सव रद्द करण्यात आल्या आहेत. मंदीर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी अडथळे उभारले आहेत. विक्रेत्यांना मंदीर परिसरापासून दूर अंतरावर जागा देण्यात आली आहे. सार्वजनीक गरबा, दांडिया मंडळांतर्फे यंदा रक्तदान, गरजूंना वस्तू वाटप असे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांची संख्या कमी असल्यामुळे उपक्रम देखील कमी राहणार असल्याचे चित्र आहे. नवरात्रोत्सव काळात फुलमाळा, पुजेचे साहित्य यासह गरबा, दांडियासाठी लागणारे विविध ड्रेस यांच्यातून मोठी उलाढाल होते. यंदा हा सर्व व्यवसाय ठप्प राहणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांना फटका बसला आहे. दांडियाची विक्री देखील ठप्प झाली आहे. नंदुरबारातील खोडाईमाता यात्रोत्सवात दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यातून अनेकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतो. स्थानिक व्यापारी व बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांचा त्यात समावेश असतो. यंदा ही सर्व उलाढाल ठप्प झाली असल्याचे चित्र आहे.