राष्ट्रीय स्वास्थ्य सेवक अभियानांतर्गत कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:35+5:302021-08-24T04:34:35+5:30
कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यशाळेत ...

राष्ट्रीय स्वास्थ्य सेवक अभियानांतर्गत कार्यशाळा
कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. तसेच कोरोना योद्धा म्हणून डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यशाळेत कोरोनाविषयी काळजी, संभाव्य कोरोनाची तिसरी लाट, स्वास्थ्यसंबंधी घ्यावयाची काळजी, पौष्टिक आहार तसेच या अभियानांतर्गत स्वास्थ्य स्वयंसेवक यांना करावयाची कामे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, प्रदेश संयोजक डॉ. भालचंद्र ठाकरे होमिओपॅथी विंग, उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. माधवी गायकवाड आयुर्वेद विंग, वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष डॉ. राकेश पाटील उपस्थित होते. त्यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. व्यासपीठावर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कुमार गावित, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर, वैद्यकीय आघाडी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सचिन भदाणे यांनी केले.