शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

शहादा महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 14:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने युवती सभेअंतर्गत विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.कार्यशाळेचे उद्घाटन नवनिर्वाचित जि.प. सदस्या जयश्री दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड.स्मिता जैन, प्रवीणा कुलकर्णी, सुवर्णा जगताप, उपप्राचार्या इंदिरा पटेल, पर्यवेक्षिका प्रा.कल्पना पटेल, प्रांजल पाटील, वंदना पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल, अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, तुषार शिंदे आदी उपस्थित होते.या वेळी लोणखेडा जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या जयश्री पाटील यांचा युवती सभेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ.पाटील म्हणाले की, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रमांचे महाविद्यालयात आयोजन केले जाते. युवती सभेच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन निर्माण केला जात असतो असे सांगून निरोगी व यशस्वी आयुष्यासाठी त्यांनी दहा सूत्रे विशद केली.द्वितीय सत्रात विनायक साळवे, अ‍ॅड.स्मिता जैन, प्रवीणा कुलकर्णी, सुवर्णा जगताप यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत विद्यार्थिनींनी विचारलेले प्रश्न व शंकांचे मान्यवरांनी निरसन केले. कार्यशाळेत १५० विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक युवती सभेच्या संयोजिका डॉ.वर्षा चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन उत्कर्षा निकम तर आभार शुभांगी परदेशी हिने मानले. कार्यशाळेसाठी डॉ.प्रशांत तोरवणे, प्रा.आर.एस. माळी, सुनील भांडारकर, गोपाळ सोनार, जितेंद्र चव्हाण, गणेश पाटील, भरत पाटील आदींनी परिश्रम घेतले.