शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

वाघाळे शिवारात कृषी विभागातर्फे महिला शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 11:31 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे :  नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथे कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व चैतन्य फाउंडेशन ...

 लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे :  नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथे कृषी विभागामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व चैतन्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगामातील हरभरा पिकावरील शेतीशाळा घेण्यात आली.            जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी रामू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही शेतीशाळा घेण्यात आली. आत्मा योजनेचे बीटीएम चंद्रकांत बागुल यांनी शेतीशाळेचे प्रास्ताविक केले. सेंद्रीय पद्धतीने हरभरा पिकाचे उत्पादन कसे वाढवाल याबाबत त्यांनी माहिती दिली. त्यात विविध सेंद्रिय कीटकनाशक, दशपर्णी अर्क, लमीत, ब्रम्हाश्र, जीवामृत बिजामृत याविषयी मार्गदर्शन केले. या गावातील बहुसंख्य शेतकरी हे हरभरा उत्पादक असल्याने हरभरा पिकाच्या अनुषंगाने कृषी सहायक शशिकांत गावित यांनी गावातील २५ हरभरा उत्पादक शेतकर्‍यांची निवड करून त्यांना शेतीशाळेबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले.                   कृषी पर्यवेक्षक संदीप पाटोळे यांनी हरभरा पिकावरील घाटे अळी, तिचे जीवनक्रम, विविध अवस्था, एकात्मिक कीड व्यवस्थापन व कमी खर्चाचे उपाय सांगून आपले पीक सुरक्षित राहते व कमी खर्चात अळीचा बंदोबस्त करता येतो. निंबोळी अर्काचा वापर केल्यास रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी करून मित्रकिडींची संख्या  वाढवता येते याबाबतची माहिती  दिली. मंडळ कृषी अधिकारी राजू हिरे यांनी हरभरा पिकावरील शत्रू व  मित्रकीड यांची ओळख, त्यांची आर्थिक नुकसानीची पातळी याबाबत मार्गदर्शन केले. ही शेतीशाळा गंगूबाई चौरे यांच्या शेतावर घेण्यात आली. शेतीशाळेस पंचायत समिती सदस्य संतोष साबळे, खंडेराय व शेषराव  महिला शेतकरी बचत गटाच्या महिला शेतकरी उपस्थित होत्या. आभार  चैतन्य संस्थेच्या जिल्हा समन्वयक मोहिनी पाटील यांनी मानले. गौतम रामराजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतीशाळा नियोजनासाठी परिश्रम घेतले.