छेडखानीची वाच्यता होऊ नये म्हणून पत्नीचा गळा आवळला
By Admin | Updated: June 8, 2017 13:45 IST2017-06-08T13:45:38+5:302017-06-08T13:45:38+5:30
मोटरसायकलच्या रेस वायरने गळा दाबून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न करणाºया पतीविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छेडखानीची वाच्यता होऊ नये म्हणून पत्नीचा गळा आवळला
>आॅनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.८ : मोटरसायकलच्या रेस वायरने गळा दाबून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न करणाºया पतीविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ जून रोजी हाटमोहिदा येथे ही घटना घडली.
हाटमोहिदा येथील माहेर असलेल्या विवाहितेचा तिच्या सासरी घरातीलच व्यक्तीने छेडखानी केली होती. त्याची वाच्यता महिलेन कुठे करू नये या कारणावरून तिचा पती कांतिलाल उत्तम कोळी रा.शनिमांडळ याचे व त्याच्या पत्नीचे हाटमोहिदा येथे महिलेच्या माहेरी भांडण झाले. रात्री महिला खाटेवर झोपलेली असतांना कांतिलाल कोळी याने मोटरसायकलची रेसवायर काढून त्याच्याने महिलेचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. परंतु आरडाओरड केल्याने त्याचा प्रयत्न फसला. या घटनेत महिलेच्या गळ्याला मोठी दुखापत झाली आहे. कांतिलाल कोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.