शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचेच पगार उशिराने का? शिक्षकांची आर्त हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

नंदुरबार : विविध कारणांमुळे शिक्षकांचे पगार अनियमित होत आहेत. सद्या कोरोना काळामुळे निधी वितरण वेळेवर होत नसल्यामुळे उशीर होत ...

नंदुरबार : विविध कारणांमुळे शिक्षकांचे पगार अनियमित होत आहेत. सद्या कोरोना काळामुळे निधी वितरण वेळेवर होत नसल्यामुळे उशीर होत असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे वेळेवर निधी मिळविण्यासाठी तसेच पगार वेळेवर होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या पगाराबाबत नेहमीच ओरड असते. असे असले तरी मध्यंतरीच्या काळात वेळेवर पगार सुरू झाले होते. सद्या कोरोना काळामुळे निधी वितरणाच्या अडचणी येत असल्यामुळे पुन्हा पगार उशीराने होत असल्याचे चित्र आहे. मार्च महिन्याचा पगार मे महिन्यात मिळाला. आता एप्रिलचा पगार कधी मिळेल याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॅा.राहुल चौधरी यांनी शिक्षकांच्या पगारासंदर्भात वरिष्ठ पातळीवर नेहमीच पाठपुरावा केला आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे काही वेळा पगार वेळेवर झाले आहेत. आता कोरोनामुळे सर्वच निधीचे वितरण उशीराने होत असल्यामुळे शिक्षकांच्या पगाराचा निधीही उशिराने येत आहे.

दरम्यान, शिक्षकांचे पगार उशिराने होत असल्याने त्यांचे विविध बाबींचे हप्ते थकत आहेत. त्यात घरकर्ज, वाहन कर्ज, विमा यासह इतर हप्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे वेळेवर पगार झाले तर ते सोयीचे ठरणार आहे.

याबाबत शिक्षक संघटनांनी देखील वारंवार याबाबत स्थानिक व वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केलेला आहे. शाळा व ब्लॅाक पातळीवरून वेळेवर पगार बिले सादर होत असतांना देखील पगाराला उशीर का? असा प्रश्न संघटनांनी देखील उपस्थित केला आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठ पातळीवर दखल घेणे आवश्यक आहे.

महिन्याच्या शेवटी होतो पगार

n दर महिन्याला पहिल्या आठवड्यात पगार होणे अपेक्षित असते. परंतु शिक्षकांचे पगार तीन आठवडे ते दीड महिना उशिराने होतात.

n याबाबत सद्या असलेली सिस्टीम बदलून नवीन सिस्टीमध्ये याची प्रक्रिया केली गेली तर पगार वेळेवर होतील का? याचीही चाचपणी केली गेली पाहिजे अशी अपेक्षा विविध शिक्षक संघटनांची आहे.

n शिक्षकांच्या पगारासाठी जालना व इतर जिल्ह्यांनी राबविलेली सीएमपी प्रणाली अवलंबवावी अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रणालीच्या प्रशिक्षणासाठी कर्मचारी गेले होते. परंतु या प्रणालीची अंमलबजावणी होऊ शकली नाही. सर्व कर्मचाऱ्यांचा या प्रणालीने पगार होत असतांना शिक्षकांचा का नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिक्षकांचे पगार वेळेवर व्हावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. परंतु सद्या कोरोना काळात पगाराच्या निधीचे वितरणाला काहीसा उशीर होत आहे. असे असले तरी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून वेळेवर पगाराचा प्रयत्न आहे.

-डॅा.राहुल चौधरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी.