हिवताप कर्मचाऱ्यांचा बेमुदत कामबंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:25 PM2019-12-16T12:25:47+5:302019-12-16T12:26:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय हिवताप योजनेचे जिल्हा परिषदेतील हस्तांतरण रद्द करण्यात यावे तसेच राष्ट्रपती राजवटीत घेण्यात आलेला ...

Warning of unpaid workloads of malicious employees | हिवताप कर्मचाऱ्यांचा बेमुदत कामबंदचा इशारा

हिवताप कर्मचाऱ्यांचा बेमुदत कामबंदचा इशारा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय हिवताप योजनेचे जिल्हा परिषदेतील हस्तांतरण रद्द करण्यात यावे तसेच राष्ट्रपती राजवटीत घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्याची मागणी करत जिल्हा हिवताप कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने केली़
आंदोलनांतर्गत १९ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप व हत्तीरोग योजना हस्तांतरण विरोधी समन्वय समितीच्यावतीने देण्यात आली़ जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ रविंद्र ढोले यांना निवेदन देण्यात आले़ मोर्चातून तोडगा न निघाल्यास २६ पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे़ यावेळी राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, जिल्हाध्यक्ष हर्षल मराठे, आऱआऱ म्हसदे, दिपक भामरे, राहुल माळकर, जी़बी़पावरा, जी़एम़पवार, बी़एऩ भावसार, बी़बी़वसावे, संदीप शेलार, आदी उपस्थित होते़

Web Title: Warning of unpaid workloads of malicious employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.