तीन वसाहतीतील प्रकल्पबाधितांच्या कूपनलिकांना वीज जोडणीची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:32 IST2019-11-15T12:32:02+5:302019-11-15T12:32:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या तीन पुनर्वसन वसाहतींमध्ये शेती सिंचन व्हावे यासाठी देण्यात ...

Waiting for power connection to the three colonial project coupons | तीन वसाहतीतील प्रकल्पबाधितांच्या कूपनलिकांना वीज जोडणीची प्रतिक्षा

तीन वसाहतीतील प्रकल्पबाधितांच्या कूपनलिकांना वीज जोडणीची प्रतिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या तीन पुनर्वसन वसाहतींमध्ये शेती सिंचन व्हावे यासाठी देण्यात आलेल्या कूपनलिकांना वीज जोडणी देण्याची कारवाई अद्यापही झालेली नाही़ यातून बाधित शेतक:यांचे शेती सिंचनाचे स्वपA अपुरे राहिले आह़े  
रेवानगर, जीवननगर आणि रोझवा पुनर्वसन या वसाहतींमधील प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतक:यांना नर्मदा विकास विभागाच्या माध्यमातून शेतांमध्ये कूपनलिका देण्यात आल्या होत्या़ कूपनलिका पूर्ण झाल्यानंतर तेथे वीज जोडणी देऊन शेतक:यांचे कृषीपंप सुरु करण्यात येणार होत़े यासाठी बाधित शेतक:यांनी तळोदा येथील विज वितरण कंपनीच्या कार्यालयात डिमांड भरुन वीजेची मागणी नोंदवली होती़ परंतू त्यावर कारवाई झालेली नसल्याने शेतक:यांचा रब्बी हंगाम वाया जाणार आह़े 
रोझवा पुनर्वसन येथील 100, रेवानगर 47 तर जीवननगर येथील 35 अशा एकूण 252 प्रकल्पबाधित शेतक:यांनी जोडणीसाठी डिमांड भरली आह़े याबाबत त्यांनी सरदार सरोवर प्रकल्प विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता़ प्रत्येक वेळी झालेल्या बैठकांमध्ये या विषयावर मार्ग निघणार अशी ग्वाही दिल्यानंतर पुन्हा ‘येरे माङया मागल्या’ असाच प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आह़े या कूपनलिकांना तातडीने वीज जोडणी देण्याची मागणी बाधित शेतक:यांनी केली असून कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आह़े 
दरम्यान याबाबत जिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य दाज्या पावरा यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, सरदार सरोवर प्रकल्प विभागाच्या बैठकीत वीज जोडणीचा मुद्दा उपस्थित करुनही अद्याप जोडणी झालेली नाही़ बाधितांच्या सिंचन सुविधा ह्या कागदावरच असल्याने शेतक:यांचे पुनर्वसन होऊच शकलेले नाही, त्याकडे शासनाने लक्ष द्याव़े 
 

Web Title: Waiting for power connection to the three colonial project coupons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.