शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाघेश्वरी चौफुली रस्ता काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन रस्ता तयार करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील वाघेश्वरी चौफुली ते भोणे फाटा दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. परंतु या रस्त्याच्या सुरुवातीला व रस्ता संपल्यावर दोन्ही बाजूला काम अपूर्ण असून तेथे मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहेत. या खड्डयांमध्ये रोज अपघात होत आहेत. वाहन चालकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, गांधीगिरी करीत या ठिकाणी जयहिंद फाऊंडेशनने खड्डयात फुले वाहून लक्ष वेधले. याबाबत जयहिंद फाऊंडेशनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा रस्ता एकुण ३८० मीटर आहे. त्यापैकी २० ते ३० मीटरचे बांधकाम अपूर्ण आहे. दरवर्षी रस्त्याची होणारी दुरवस्था लक्षात घेऊन ३८० मीटर लांबी व १२ मीटर रुंदी असा रस्ता मंजूर करण्यात आला. यासाठी दोन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक देखील मंजूर करण्यात आले. त्यापैकी रस्ते कामावर एक कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तरीदेखील जर अपघात घडत असतील आणि सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येणार असेल तर एवढा मोठा निधी खर्च झाल्याचा उपयोग काय? हा भाग नेहमी रहदारीचा असतो या रस्त्यावरून हजारो वाहने ये-जा करीत असतात. परंतु या प्रवाशांना रस्ता बांधकाम झाल्यानंतर देखील समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वाघेश्वरी चौफुली कडील भाग खड्ड्यांनी व्यापलेला असून त्यानंतरचा रस्त्याच्या शेवटचा भाग मुख्य रस्त्यापासून एक फूट उंचीवर आहे. हा अत्यंत धोकादायक आहे. एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा व्हावा यासाठी बांधकाम करताना कोणता पर्याय वापरण्यात आला आहे हा देखील संशोधनाचा भाग असून यावर देखील योग्य उपाय शोधणे आवश्यक आहे.तातडीने कामास सुरुवात करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा जयहिंद फाउंडेशन तर्फे दिग्विजय राजपूत, भूषण राजपूत, अक्षय कोकणी, फारुख, मोईन शेख व कार्यकर्त्यांनी दिला आहे.या ठिकाणी खड्डयांचे प्रमाण वाढल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती मलमट्टी करून डांबर व खडी टाकली. यामुळे सोय होण्याऐवजी गैरसोय झाली. खडींमुळे वाहनांचे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय दुचाकी वाहनांचा तोल जावून पडण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. ही बाब लक्षात घेता या रस्त्याची कायमस्वरूपी दुरूस्ती करून अपुर्ण राहिलेले काम पुर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे. त्याचसाठी हे आंदोलन करण्यात आले.