शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

देवबारा येथे हजारो भाविकांच्या साक्षीने वाग्देव यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : सापुड्यात सणोत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. या भावभक्तीतच देवबारा ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : सापुड्यात सणोत्सवाला सुरुवात झाली असून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. या भावभक्तीतच देवबारा ता. धडगाव येथे दोन दिवसीय वाग्देव यात्रोत्सव पार पडला. या यात्रेत मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवला.निसगार्चा एक भाग असलेल्या वनांमध्ये निवास करणाऱ्या वाघाने गावशिवारातील पशु-पक्षी, मानवांवर हल्ला करू नये, गावपाड्यात समृद्धी नांदावी यासाठी माघ महिन्यात महाशिवारात्रीपूर्वी वाग्देवता पूजन केले जाते. येथे पूजन झाल्यानंतर आदिवासी बांधव याहामोगी देवीच्या दर्शनासाठी देवमोगरा (गुजरात) येथे रवाना होतात. वाग्देवाला आदिवासी महिलांकडून बांबूच्या नव्या टोपलीत आणलेले धनधान्य आणि महू फुलांची दारु यांचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवल्यानंतर पूजन करून ठिकठिकाणी यात्रोत्सवांना प्रारंभ करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून ही आजही कायम ठेवली आहे.या यात्रेसाठी धडगाव तालुक्यातील मांडवी, खामला, काकरदा, घाटली, निगदी, वलवाल, गोरांबा यासह अन्य गावातील पंचमंडळी देखील सहभागी झाले असून यात्रेसाठी त्यांनीही योगदान दिले आहे.

धडगाव-शहादा रस्त्यावर देवबारा हे गाव असून त्याची वाग्देवाचे स्थान म्हणून आदिवासींमध्ये ओळख आहे. तेथे महाशिवरात्रीपूर्वी यात्रोत्सवाची परंपरा आहे. सोमवारी सुरु झालेल्या या यात्रोत्सवात पारंपरिक वेशभूषेत महिला आणि पुरुषांनी लक्ष वेधून घेतले. डोक्यावर पांढरे कापड बांधलेल्या बांबूच्या टोपल्या घेत महिला वाग्देवाची स्तुतीगीते सादर करण्यात आली. या ठिकाणी रात्री सोंगाड्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. यात कलावंतांनी गीत व नाटकातून वाघाचे महत्त्व व त्यांचे संवर्धन कसे झाले पाहिजे याबाबत प्रबोधन केले. आदिवासी समुदायात देवरुप मानल्या गेलेल्या वाघाची दिनचयार्ही त्यांनी सोंगाड्या पार्टीद्वारे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. देवबारा येथील यात्रेनंतर सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातील यात्रोत्सवांना सरुवात होते. महाशिवरात्रीपासून दुर्गम भागातील तोरणमाळ आणि देवमोगरा येथे यात्रोत्सव असल्याने आदिवासी बांधवांमध्ये चैतन्य संचारल्याचे सध्या दिसून येत आहे.