शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरणासाठी मतदारयादीचा सहारा- जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, महेश सुधळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ. भारुड म्हणाले की, प्रत्येक तालुक्यासाठी दोन पथके तयार करून त्यांच्यामार्फत शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अधिकाऱ्यांनी गावातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घ्यावे. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने समन्वयाने अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण होईल, याचे नियोजन करावे. १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार असल्याने मतदार यादीचा उपयोग करून पात्र व्यक्तींची नोंदणी करण्यात यावी.

ग्रामीण भागात ॲन्टिजन व आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. प्रत्येक फिरत्या पथकाद्वारे दिवसाला किमान १०० आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात. गावात नव्याने बाधित आढळल्यास त्याला त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे. बाधितांची संख्या अधिक असल्यास त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल करावे. अधिक बाधित असलेल्या गावात उपघटना व्यवस्थापकांनी भेट देऊन प्रत्येक बाधित व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात राहील, याची खात्री करावी.

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी कोविड सेंटरला भेट देऊन तिथल्या व्यवस्थेची माहिती घ्यावी. कोविड केअर सेंटरसाठी कंत्राटी परिचारिकांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी. कोरोना चाचण्यांमध्ये निरंतरता राहावी, यासाठी चाचण्यांच्या किटचे व्यवस्थापन नीट करावे. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

ग्रामीण भागात लसीकरण शिबिरांना चांगला प्रतिसाद मिळत असून, येत्या काळात प्रत्येक गावात या प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात येईल, असे गावडे यांनी सांगितले.

बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.