शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय तृतीया व ईदच्या आनंदावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

नंदुरबार : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेची खरेदी, नवीन वास्तूत प्रवेश, नवीन वास्तू खरेदी यासह इतर अनेक ...

नंदुरबार : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेची खरेदी, नवीन वास्तूत प्रवेश, नवीन वास्तू खरेदी यासह इतर अनेक बाबींवर कोरोनाने पाणी फेरले आहे. याशिवाय योगायोगाने याच दिवशी आलेल्या रमजान ईदच्या खरेदीलाही कोरोनाने ब्रेक बसविला आहे. यामुळे कोट्यवधींची उलाढाल जिल्ह्यात ठप्प झाली आहे. गेल्या वर्षी देखील अशीच स्थिती होती. त्यामुळे व्यापारीवर्ग हवालदिल झाल्याचे चित्र आहे.

गुढीपाडवा आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असते. अक्षय तृतीयेला तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानले जाते. त्यामुळे या दिवशी नवीन कामाचा शुभारंभ किंवा वास्तू प्रवेश, वास्तू खरेदी केली जाते. सोने खरेदीलादेखील या दिवशी महत्त्व असते. परंतु कोरोना व संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद असल्यामुळे व्यवहार ठप्प झाले. अनेकांना आपले नियोजन पुढे ढकलावे लागले आहे. या सर्वांमध्ये व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या वर्षी देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती.

रियल इस्टेटचे व्यवहार ठप्प

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन घर, प्लॅाट खरेदी न झाल्याने रियल इस्टेट क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. नोटबंदीपासून हे क्षेत्र जेमतेम जम बसविण्याचा प्रयत्न करीत असतांना गेल्या वर्षापासून कोरोना आणि लॅाकडाऊनने पुन्हा या क्षेत्राची रुळावर आलेली गाडी रुळावरून खाली उतरली आहे. दिवाळीपासून थोडेफार व्यवहार सुरू झाले असतांना पुन्हा मार्चपासून कोरोनाच्या कहरने थैमान घालून व्यवहार ठप्प झाले. गेल्या अडीच महिन्यात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याची नोंद उपनिबंधक कार्यालयात झाली आहे.

सराफा बाजारात शुकशुकाट

सराफा बाजारात देखील १ एप्रिलपासून शुकशुकाट आहे. ऐन लग्न सराई आणि गुढीपाडवा व अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देखील बाजारात उलाढाल होऊ शकली नाही. गेल्या वर्षी देखील तब्बल दोन महिने सराफा बाजार बंद होता. त्यानंतर आता पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. आता थेट जून महिन्यात सराफा बाजार उघडणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे दोन महिन्यातील कोट्यवधींची उलाढाल यंदाही ठप्प झाली आहे. सराफा व्यावसायिकांना सकाळच्या सत्रात दुकाने उघडी ठेवण्याची मागणी करण्यात येत असली तरी त्या मागणीकडे लक्ष दिले गेले नसल्याचे चित्र आहे.

अक्षय तृतीयेच्या आनंदावर विरजण

अक्षय तृतीयेचा आनंद व उत्साहावर यंदा विरजण पडले आहे. कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या नातेवाइकांचे निधन झाले आहे. अनेकजण कोरोनातून बाहेर आले तरी आर्थिक व मानसिक खच्चीकरणामुळे ते अजूनही त्यातून सावरलेेले नाही. अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. हातावर पोट असलेल्यांना रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे यंदाच्या अक्षय तृतीयेवर विरजण पडल्याचे चित्र आहे.

ईदचा उत्साहही कमी

यंदा ईदचा उत्साह देखील कमी झाला आहे. कोरोना काळातच रमजानचे रोजे आले. शुक्रवारी ईद साजरा होत असली तरी ती सार्वजनिकरित्या साजरी करण्यात अडचणी येणार असल्याने उत्साह पार मावळला आहे.

मुस्लीम समाजात रमजान ईदचे मोठे महत्त्व असते. संपूर्ण परिवार व नातेवाइक एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा देत व शीरखुर्माची दावत देत हा सण साजरा करतात. त्यासाठी घरांची सजावट, नवीन कपडे, वस्तू खरेदी केले जातात. त्यासाठी महिनाभरापासूनच त्याची तयारी केली जाते, खरेदी केली जाते. यंदा मात्र महिनाभरापासून लॅाकडाऊन असल्यामुळे खरेदीवर विरजण पडलेच. शिवाय ईद साजरी करण्यावरही मर्यादा आल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम धर्मगुरूंनीच तसेच विविध धार्मिक संघटनांनी ईद साजरी करतांना प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.