शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनमेंट झोनमध्ये आदेशाचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : कंटेनमेंट झोनमधील नागरिक सक्त मनाई आदेश असतांनाही आदेशाचे पालन न करता सर्रास बाहेर फिरत ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कंटेनमेंट झोनमधील नागरिक सक्त मनाई आदेश असतांनाही आदेशाचे पालन न करता सर्रास बाहेर फिरत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यापुढे अशी व्यक्ती फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ईशारा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.याबाबत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहरात दोन ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्यानंतर हे परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ते परिसर सील करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना बाहेर न पडण्याचे सक्त मनाई आदेश आहेत, असे असतांना शासनाच्या आदेशाचे भंग करून ते सर्रास बाहेर फिरत असल्याचे आढळून येत आहे. अशा नागरिकांवर यापुढे शासनाच्या नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याच बरोबर पुणे, मुंबई, सुरत, मालेगाव, सौराष्टÑ अशा भागातून येणाºया व्यक्तींची नोंद आमलाड विलगीकरण कक्षात केली जाते. शिवाय आरोग्य तपासणीही केली जात असते. कोणतीही लक्षणे आढळून न येणाऱ्यांवर शिक्का मारून घरीच राहण्याची सूचना दिली असते. परंतु असे व्यक्तीही बाजार पेठेत विविध कार्यक्रमात हजेरी लावत असल्याच्या तक्रारी आहेत, अशा व्यक्तींवरही यापुढे कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, तळोदा शहरात सुरूवातीला कोरोनाचे रूग्ण नव्हते. परंतु गेल्या १५ दिवसात अचानक रूग्ण वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. परंतु भिती असली तरी बहुतांश नागरिकांकडून काळजी घेतली जात नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी व शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले जात आहे.शासनाच्या आमलाड विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या रूग्णांपैकी काही रूग्णांनी तेथे नियुक्तीवर असलेल्या आरोग्य कर्मचाºयांशी हुज्जत घालण्याचा प्रकार केला होता. या शिवाय कर्मचाºयांशी झटापटही केल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषत: आता जे सात पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या पैकी काहींनी हा प्रकार केल्याचे पत्रात नमूद केले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यापुढे कोणी असे गैरवर्तन करताना आढळले तर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल