व्हेंटीलेटरची मात्र प्रतिक्षा करावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 12:19 PM2020-04-06T12:19:23+5:302020-04-06T12:19:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनासोबत लढण्यासाठी साधनसामुग्रींनी युक्त व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला दोन कोटी रुपयांचा निधी ...

The ventilator will just have to wait | व्हेंटीलेटरची मात्र प्रतिक्षा करावी लागणार

व्हेंटीलेटरची मात्र प्रतिक्षा करावी लागणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनासोबत लढण्यासाठी साधनसामुग्रींनी युक्त व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे़ या निधीतून तातडीने विलगीकरण कक्षांसाठी व्हेंटीलेटर खरेदी केले जाणार असून या व्हेंटीलेटरची दीर्घ काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे़
जिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात दोन व्हेंटीलेटर आहेत़ सोबत जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांकडून १४ व्हेंटीलेटरर्स अधिग्रहीत करण्यात आले आहेत़ गरज पडल्यास या व्हेंटीलेटरर्सचा उपयोग केला जाणार आहे़ परंतू आरोग्य सेवेवर ताण पडू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी आपत्कालिन परिस्थितीसाठी जिल्हा वार्षिक योजनेंंतर्गत दोन कोटींचा निधी व्हेंटीलेटर खरेदीसाठी देण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या निधीनंतर जिल्हा रुग्णालयाने मुंबई येथील आरोग्य साहित्य व मशिनरी पुरवठादारांसोबत संपर्क करुन साधारण २० व्हेंटीलेटरची नोंद केली आहे़ परंतू संबधित पुरवठादाराकडे राज्यातील इतर ठिकाणाहून व्हेंटीलेटर्सची मागणी नोंदवली गेली असल्याने नंदुरबार जिल्ह्याला तातडीने मशिन पुरवठा होण्याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे़ व्हेंटीलेटर तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत शासनाने थेट बोलणे केले असले तरी त्यांचे उत्पादन कमी असल्याने जिल्ह्याच्या वाट्याला तातडीने व्हेंटीलेटर येण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे़
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये यांना संपर्क केल्यावर त्यांनी सांगितले की, प्रशासनाने दिलेल्या निधीतून व्हेंटीलेटर खरेदीसाठी पाठपुरावा सुरु आहे़ मुंबई येथे बोलणे सुरु असून येत्या काळात आपल्याला चांगल्या दर्जाचे व्हेंटीलेटर प्राप्त होण्याची शक्यता आहे़
दरम्यान आरोग्य यंत्रणेकडे जिल्हा रुग्णालयासह सात ठिकाणच्या कोरोना विलगीकरण कक्षात काम करणाºया डॉक्टरांसाठी मुबलक साहित्य असल्याचा दावा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला आहे़

Web Title: The ventilator will just have to wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.