शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे वाहनांचे होतेय नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : नेत्रंग शेवाळी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून रत्यावर महाकाय खड्डे पडले आहे. हे खड्डे ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : नेत्रंग शेवाळी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून रत्यावर महाकाय खड्डे पडले आहे. हे खड्डे वाहनधारकांना टाळणे अशक्य होत असून जड व अवजड वाहनांसह चारचाकी वाहनांना या महाकाय खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतो. अशाच एका खड्ड्यातून मार्गक्रमण करीत असतांना एका ट्रकचा पाटा तुटला व ट्रक त्याच खड्ड्यातच अडकला.आंतरराज्य वाहतुकीसाठी सोयीच्या जीजे १२ बीवाय २०२३ हा ट्रक कापूस भरून कर्नाटक राज्यातील देवलीया येथून गुजरात राज्यातील कढी येथे जात होता. हा वाण्याविहिर ते अक्कलकुवा दरम्यान असणाऱ्या पिंप्रिपाडा फाट्याजवळील खड्ड्यांचा अंदाज घेत ट्रक चालकाने ट्रक हळूवार खड्ड्यातून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्रक चालकाचा हा प्रयत्न फसला व ट्रकची मागची चाके खड्ड्यात आदळला गेला. त्यामुळे ट्रकचा पाटा तुटला व ट्रक एका बाजूला झुकला आहे. या प्रकारामुळे क्षणभर नेमके काय घडले हेच वाहनचालकाच्या लक्षात आले नाही. जेव्हा हा प्रकार वाहनचालक व सहचालकाच्या लक्षात आला तेव्हा नेमके हसावे की रडावे, अशी द्विधा अवस्था निर्माण झाली आहे. चालकाने ट्रक मागे-पुढे करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात अपयश आले. अधिक प्रयत्न केला तर ट्रक पलटण्याची शक्यता असल्याने ट्रक तेथेच थांबवला.दरम्यान, नेत्रंग- शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महाकाय खड्ड्यामुळे जड-अवजड वाहने ट्रक, ट्राला यांचे पाटा तुटणे व अन्य स्पेअरपार्ट निकामी होण्याचे प्रकार वाढले आहेत. तळोदा ते खापर दरम्यान दररोज अश्या प्रकारचे लहान मोठे चार ते पाच नादुरुस्त होऊन उभे असलेले दिसून येतात. या मार्गावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनांच्या मेंटेनन्सचा खर्च वाढला आहे. त्यामुळे रस्ता प्राधिकरण्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.