शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

नंदुरबार - आपल्या देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो. त्यासाठी आपल्या देशाचे संविधान म्हणजेच आजची आपली भगवतगीता होय, ...

नंदुरबार - आपल्या देशाचा कारभार हा संविधानानुसार चालतो. त्यासाठी आपल्या देशाचे संविधान म्हणजेच आजची आपली भगवतगीता होय, असे मत हिरा प्रतिष्ठान अधिनिस्त विद्यालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पितांबर सरोदे यांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी, संचालक बलवंत जाधव, डॉ. सुधीर भोलाणे, सचिव रूपेश चौधरी, हिरा उद्योग समूहाचे संचालक प्रणव चौधरी, प्रथमेश चौधरी, गौरव चौधरी, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र फटकाळ, प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक किरण त्रिवेदी, नर्मदा विकासचे विस्तार अधिकारी विजय पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. गणेश पवार, चेतना चौधरी यांनी सूत्रसंचालन, तर युवराज भामरे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी पी. के. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, इंदुबाई हिरालाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, हिरालाल मगनलाल चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, संस्कृती शिशुविहार व नूतन बालमंदिराचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

शहीद शिरीषकुमार मंडळातर्फे प्रतिमापूजन

नंदुरबार शहरातील शहीद शिरीषकुमार मित्रमंडळातर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन व भारतमाता पूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी नंदुरबार जिल्हा व्यावसायिक फोटोग्राफर संघटनेचे सचिव भूषण पाठक यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. महिला विकास आर्थिक महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे, तर हुतात्मा शिरीषकुमार प्रतिमेचे पूजन पुणे येथील राजेंद्र बिडकर यांनी केले. सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांनी राष्ट्रगीतानंतर मार्गदर्शन केले. यावेळी हितेश पाठक यांनी रंजना पाठक यांच्या स्मरणार्थ प्रजासत्ताकदिनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. कार्यक्रमास सुनीता हिरणवाळे, नंदा हिरणवाळे, वंदना जव्हेरी, सोनाल मोरे, लीना हिरणवाळे, भाग्यश्री हिरणवाळे तसेच सुभाष चौधरी, आनंदा घुगरे, अमेय संगेकर, गोपाल हिरणवाळे, आदींसह नागरिक उपस्थित होते.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, नंदुरबार

नंदुरबार तालुक्यातील टोकरतळे येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी इंदिरा महिला सहकारी बँकेच्या कविता रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

लोकशाही दिन संविधानामुळे टिकून

शहादा : जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आज संविधानामुळे टिकून आहे. लोकशाही, विविधता आणि विकासाचे आश्वासन म्हणजेच भारताचे संविधान आहे. स्वतःच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देण्याची ताकद भारतीय संविधानाने निर्माण केली. म्हणून कोणत्याही निराश असलेल्या समाजघटकाला किंवा व्यक्तीला भारताचे संविधान हे आशा निर्माण करणारे प्रेरणास्रोत वाटते, असे प्रतिपादन प्रांताधिकारी चैतन गिरासे यांनी केले. अंनिस आणि जायंट्स ग्रुप यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, महात्मा फुले समता परिषदेचे राजेंद्र वाघ, ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष संतोष महाजन, जायन्ट्स ग्रुपचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, जायन्ट्स सहेलीच्या अध्यक्षा दीपाली बाविस्कर, आदी मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात १०५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. संविधान बांधीलकी महोत्सव या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभू सदाशिव पाटील, लियाकत अली सय्यद, राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष माणक चौधरी, ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अलका कुलकर्णी, ‘अंनिस’चे माजी जिल्हा अध्यक्ष डॉ. शशांक कुलकर्णी, नायब तहसीलदार गोस्वामी, जायन्ट्सचे पदाधिकारी के. केे. सोनार, संजय सोनार, फिरोज राजा, प्रमोद सोनार, आर. टी. पाटील, अर्चना सोनार, बतुल बोहरी, सकीना राजा, डॉ. स्मिता जैन, आदी मान्यवर उपस्थित होते.

भारती पवार यांनी सूत्रसंचालन केले. विनायक सावळे यांनी प्रास्ताविक, तर संगीता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ‘महा अंनिस’चे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, शाखा कार्याध्यक्ष संतोष महाजन, शाखा प्रधान सचिव आरिफ मन्यार, प्रदीप केदारे, प्रवीण अहिरे, विजय बोडरे, रेवती बोडरे, एस. यू. वसावे, कबीर पेंढारकर, भटू वाकडे, वैष्णवी जयस्वाल, गायत्री महाजन, किरण महाजन, हितेश ईशी, आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.