शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST

पोलीस ठाणे, अक्कलकुवा वाण्याविहीर : अक्कलकुवा पोलीस ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या वेळी ...

पोलीस ठाणे, अक्कलकुवा

वाण्याविहीर : अक्कलकुवा पोलीस ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या वेळी पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस निरीक्षक अरविंद पाडवी, सहायक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन, पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.

राजे शिवाजी विद्यालय, नंदुरबार

नंदुरबार : येथील राजे शिवाजी विद्यालय, विद्यासागर पब्लिक स्कूल, ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या पटांगणात मोठ्या उत्साहात प्रशासनाच्या नियमाचे आदर राखून तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी राजेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष भाजप दीपक पाटील, मराठा सेवा संघ नंदुरबार जिल्हा अध्यक्ष रमेश पाटील, हरीश हराळे, आनंदराव करनकाळ, चंद्रशेखर पाटील, भरत पाटील यांच्या हस्ते छत्रपतींची प्रतिमा पूजन व माल्यार्पण करून मोठ्या उत्साहात शिव जयंती साजरी करण्यात आली. या सोहळ्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक युवराज पाटील व विद्या युवराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी राजे शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक, विद्यासागर पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक, ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

शहादा

शहादा : शहरात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करताना सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नंदुबार जिल्हा परिषद सभापती अभिजित पाटील, नगरपालिका नगरसेवक मकरंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सुनील पाटील, नगरसेवक संदीप पाटील, उपसरपंच अनिल भामरे, रमाशंकर माळी, किशोर मोरे, सरपंच समितीचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, युवा नेते मयूर दीपक पाटील उपस्थित होते.

अ.भा.माळी महासंघ, नंदुरबार

नंदुरबार येथील अखिल भारतीय माळी महासंघातर्फे अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे अ.भा. माळी महासंघातर्फे शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्यास प्रमुख पाहुणे मोहन लोटन सोनवणे, यादवराव पाटील यांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आले. या वेळी मान्यवरांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार जात, धर्म, वर्ण, लिंग, वंश देश, राज्य यांचा भेद न करता एकत्र राहून मानवी जीवन सुंदर व उदात्त बनवू या अशी संकल्पना घेऊन राजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. याप्रसंगी आकाश झाल्टे, किशोर माळी, जयेश माळी, सुनील जाधव, भावेश माळी, छोटू माळी, महासंघाचे तालुकाध्यक्ष पोपट माळी आदी उपस्थित होते. आभार महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज गायकवाड यांनी मानले.