शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:22 IST

येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आई, वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेच्यावतीने १५ जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमित्त ...

येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आई, वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्थेच्यावतीने १५ जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक कायदा साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दिवाणी न्यायाधीश तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सतीश मलिये यांनी ज्येष्ठ नागरिकांना न्यायालयाकडून दिल्या जाणाऱ्या योजना सवलतीविषयी माहिती दिली.

यशवंत स्वर्गे यांनी तरुण पिढीला संस्काराची गरज असल्याचे सांगत, पीडित ज्येष्ठ नागरिक आणि शासनाचे अधिकारी यांच्यात समन्वय साधण्याचे संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

नामदेव शिंदे, आत्माराम चौत्राम इंदवे यांनी मनोगत व्यक्त केले. आपबिती या सदराखाली सुदाम दळवी, प्रमिला नाना पवार, सनतकुमार अनिरुद्ध त्रिवेदी, पद्माकोर राजपूत यांनी आपल्या व्यथा मांडल्या. जिल्हा पेन्शनर संघाचे अध्यक्ष मधुकर रामजी साबळे यांनी एकूण ७ ठराव मांडले. पोलीस निरीक्षक महेश माळी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. नीलम रवींद्र पाटील हिने कविता सादर केली. ॲड. गोविंदभाई पाटील, हैदरअली नुरानी, वसंत चौधरी, डॅा. पितांबर सरोदे, सय्यद इ.डी. लियाकतअली, मगनभाई पाटील, तिरथदास धनवाली, नगिनदास अग्रवाल, जावेद गमीर धोबी, श्रीकांत पाठक, अशोक टेंभेकर आदी उपस्थित होते.

आनंदा बारका पाटील आणि आत्माराम चौत्राम इंदवे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी लागणारा खर्च आणि परिश्रम घेतले. प्रास्ताविक बारकू नवल पाटील यांनी केले.

सूत्रसंचालन गणपत पाटील यांनी केले.

यावेळी पुढील मागण्या करण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षणाबाबतच्या कायदेशीर तरतुदींची अंमलबजावणी करावी. आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुला-मुलींची यादी जाहीर करावी. ज्येष्ठ नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करावी. ज्येष्ठ नागरिक कक्षाचे कामकाज प्रभावीपणे राबविण्यात यावे. पोलीस अधिकारी /कर्मचारी यांना ज्येष्ठ नागरिक कायद्याचे प्रशिक्षण द्यावे. जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष पोलीस युनिट तयार करण्यात यावे. पोलीस प्रशासनाने १५ जून ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस पाळावा.