शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात लसचा डोस वाया जाण्याचे प्रमाण शून्य टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात पहिला आणि दुसरा डोस मिळून दोन लाख लसी देण्यात आल्या आहेत. या लसींचा पुरवठा नियमित असल्याने ...

नंदुरबार : जिल्ह्यात पहिला आणि दुसरा डोस मिळून दोन लाख लसी देण्यात आल्या आहेत. या लसींचा पुरवठा नियमित असल्याने जिल्ह्यात लसीकरण सुरळीत झाले असून प्राप्त झालेल्या व्हायलमधून एकही डोस आजवर वाया गेलेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात १२ हजार २७३ आरोग्य कर्मचारी, १० हजार ५३६ फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ ते ६० पेक्षा अधिक वय असलेले ६ लाख ३३८ आणि १८ ते ४४ वयोगटातील आठ लाख ३४ हजार ९० अशा एकूण १४ लाख ५८ हजार जणांना नजरेसमाेर ठेवत लसीकरण सुरु करण्यात आले होते. यात सर्वात प्रथम आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात आली. आरोग्य विभागात काम करणा-या सर्व कर्मचा-यांच्या नोंदण्या करुन लसीकरण सुरु करण्यात आले होते. प्रारंभी लसीकरणाचा कमी असलेला वेग दुपटीने वाढून त्यात आणखी इतर संवर्गातील आरोग्य कर्मचारी समाविष्ट होवून ही संख्या १३ हजार ३७१ झाली होती. या सर्वांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरु असताना १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण थांबवण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहे. यातून आरोग्य फ्रंटलाईन कर्मचा-यांना दुसरा तर ज्येष्ठांना पहिला आणि दुसरा डोस देण्यास गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात साधारण ५० हजाराच्या जवळपास कोविशिल्डचे डोस शिल्लक असल्याने सर्व ४४ केंद्रांवर लसीकरण सुरळीत सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र तयार करुन नोंदणी करणा-यांना लस देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकही डोस वाया जात नाही..

जिल्ह्यात जानेवारी मध्यात सुरु झालेल्या लसीकरणात आजवर एकही डोस वाया गेला नसल्याचे सांगण्यात आले. एका व्हायलमध्ये १० डोस तयार करता येतात. परंतू जिल्ह्यातील कर्मचारी काटकसर करत एका डोसमधून १२ लसी तयार करतात.

साधारण दोन लसी ह्या वाढीवच असल्याने त्यांचा वापर होतो. प्रत्येक केंद्रात लसीकरणासाठी नोंदणी होत असल्याने लस वाया जातच नाहीत. कधीकधी व्हायल संपल्यावरही नागरीक केंद्रात असतात.

ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर सकाळी ५ वाजेपासून रांगा

nसातपुड्याच्या दुर्गम भागातील दोन तालुक्यांसह सपाटीच्या चार तालुक्यात निर्माण केलेल्या केंद्रांवर पहाटे पाच वाजेपासून नागरिक रांगा लावत असल्याचे चित्र आहे. मात्र नोंदणी करण्यात अडचण येत असल्याने अनेकांना रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याचे चित्र आहे. नोंदणी करण्याबाबत नागरिकांची समजूत घालताना आरोग्य कर्मचाऱ्यांची दमछाक होते आहे.

जिल्ह्यातील ४५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या १ लाख १२ हजार ४३६ नागरीकांना लसीचा पहिला डाेस पूर्ण झाला आहे. एकूण ४.१९ टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

nआरोग्य विभागाकडून सहा तालुक्यातील ४४ व त्यापुढील वर्गासाठी केलेल्या सर्वेक्षणात एकूण ६ लाख नागरीक असल्याचे समोर आले होते. या सर्वांना लस दिली जाणार आहे.