गोगापूरजवळील बंधारा ठरणार निरुपयोगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:33 IST2019-11-15T12:33:32+5:302019-11-15T12:33:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील गोगापूर ते लोहारे गावादरम्यान आडी-खापरी नदीवर असलेल्या साठवण बंधा:यात पाणी अडविण्यासाठी पाटय़ा ...

गोगापूरजवळील बंधारा ठरणार निरुपयोगी
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा तालुक्यातील गोगापूर ते लोहारे गावादरम्यान आडी-खापरी नदीवर असलेल्या साठवण बंधा:यात पाणी अडविण्यासाठी पाटय़ा बसविण्यात न आल्याने पाणी वाहून जात आहे. या प्रकारामुळे शेतक:यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या बंधा:याच्या 14 लोखंडी पाटय़ा दुरुस्तीसाठी नेल्या आहेत. मात्र एक महिना उलटूनही पाणी अडविण्यासाठी पाटय़ा टाकण्यात न आल्याने पाणी वाहून जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, आडी-खापरी नदीवर साठवण बंधारा आहे. या बंधा:यातील पाण्याचा गोगापूर, दामळदा, तिधारे, लोहारे येथील शेतक:यांना शेती सिंचनासाठी उपयोग होतो. या धरणात अडवलेल्या पाण्यामुळे सुमारे 200 एकर शेतजमिनीला फायदा होतो. या वर्षी मे महिन्यात लाखो रुपये खर्च करून या बंधा:याची दुरुस्ती झाली, असे शेतक:यांनी सांगितले. मात्र जुलै-ऑगस्टमध्ये या नदीला पूर आला व त्याचा फटका या बंधा:याला बसला. पुरामुळे पुन्हा गळती सुरू झाल्याने दुरुस्ती करणा:या संबंधित ठेकेदाराने साठवण बंधा:यात पाणी अडविण्यासाठी टाकाव्या लागणा:या 14 लोखंडी पाटय़ा दुरुस्तीसाठी नेल्या आहेत. मात्र अद्याप त्या दुरुस्त होऊन आल्या नाहीत. शेतक:यांनी संबंधित ठेकेदाराला वारंवार फोन करून तक्रारही केली. मात्र आजच्या स्थितीला अजून पाटय़ा टाकलेल्या नाहीत. पावसाळा संपला, नदीचे सर्व पाणी वाहून चालले आहे. या बंधा:यात पाणीसाठा झाला नाही तर शेतक:यांना शेतीसाठी पाणी कुठून मिळणार? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतक:यांनी व्यक्त केल्या आहेत.
गेल्या एक महिन्यापासून शेतकरी या बंधा:यात पाटय़ा टाकून पाणी अडविण्याची मागणी ठेकेदाराकडे करीत आहेत. मात्र ठेकेदाराने पाटय़ा टाकण्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष घालून बंधा:यात तातडीने पाटय़ा टाकून पाणी अडविण्याबाबत या ठेकेदाराला सक्त ताकीद द्यावी व पाटय़ा टाकण्यासाठी लागलेल्या विलंबाबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी काशीनाथ रामदास पाटील, भाऊराव गुलाब पाटील, अशोक खंडू पाटील, मोहन गोविंद पाटील, माणक सखाराम पाटील, गणेश रामदास ईशी, नारायण दशरथ पाटील, रघुनाथ दशरथ पाटील, सतीश माधव पाटील, गोटू दुल्लभ पाटील आदी शेतक:यांनी केली आहे.