खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:43 IST2019-11-15T12:43:30+5:302019-11-15T12:43:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील खेतिया आंतरराज्य महामार्गावरील सुसरी धरणाच्या वळणावर दरा फाटा ते ब्राrाणपुरी या मार्गावरील ...

खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील खेतिया आंतरराज्य महामार्गावरील सुसरी धरणाच्या वळणावर दरा फाटा ते ब्राrाणपुरी या मार्गावरील मोठमोठे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित ठेकेदाराने चक्क मातीचा वापर करीत खड्डे थातूरमातूर बुजविल्याचे चित्र समोर आले आहे. या मातीमुळे यामुळे धूळ उडत असल्याने वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे.
सविस्तर वृत्त असे की, गेल्या दीड वर्षापासून कोळदा ते खेतिया या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावरील खेतिया या आंतरराज्य महामार्गावरील दराफाटा ते ब्राrाणपुरी मार्गावरील रुंदीकरणाचे काम स्थगित ठेवण्यात आले आहे. यामुळे या मार्गावर एक ते दीड फुटाचे खड्डे पडल्याने अपघाताची मालिका थांबता थांबत नव्हती. हे खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत होती. हे खड्डे संबंधित ठेकेदाराने बुजविले. परंतु खड्डे बुजविण्यासाठी चक्क मातीचा वापर करीत ते बुजविण्यात आले. मातीमुळे धूळ उडत असल्याने दुचाकीस्वारांच्या डोळ्यात धूळ जात असल्याने अपघाताची संख्या वाढली आहे.
हा आंतरराज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास नाशिक विभागाकडे हस्तांतर करण्यात आला आहे. परंतु संबंधित विभागाकडून या महामार्गाचे काम संथगतीने होत असल्याने दराफाटा ते ब्राrाणपुरी मार्गावरील सुसरी धरणाच्या वळणावर पूर्णत: उखडून गेला. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहादा-खेतियाकडे जाणारे वाहतूकदार खड्डय़ामुळे हा मार्ग सोडून दुस:या मार्गाचा वापर करीत आहेत. या मार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.