शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वधर्म समभाव जागृतीचा अनोखा फंडा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : भारतीय लोकसंस्कृती जीवंत ठेवण्यासाठी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनवून लोकांमध्ये देशभक्ती जागृती करण्याचे काम नागपूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : भारतीय लोकसंस्कृती जीवंत ठेवण्यासाठी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनवून लोकांमध्ये देशभक्ती जागृती करण्याचे काम नागपूर येथील मुस्लीम कुटुंब करीत आहे. हे कुटुंब सध्या सारंगखेडा यात्रेनिमित्त शहादा परिसरात आले आहे.भारतातील विविध राज्यातील कला, संस्कृती, गीत, बोलीभाषा वेगवेगळी आहे. असे असले तरी भारतीय लोक देशाचा व देशहिताचा विचार आल्यावर एकत्र येतात व देशभक्ती जागृत करण्याचे व ठेवण्याचे काम आजही करतात. या लोकसंस्कृतीच्या माध्यमातून बरेच जण आपला उदरनिर्वाहही चालवतात. नागपूर येथील रहमत शेख , सितारा शेख, संजूम शेख व अहमद शेख ही एकाच कुटूंबातील मंडळी आपली पोटाची खळगी भरण्यासाठी आपली कला गेल्या २५ वर्षापासून गावोगावी सादर करीत आहेत. या कुटुंबाने सारंगखेडा यात्रेत हजेरी लावून सध्या शहादा शहर व परिसरात कार्यक्रम सादर करीत आहेत. लोकगीते, भजन व कव्वालीचा माध्यमातून राज्यभर फिरुन हे कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवतात. विशेष बाब म्हणजे हे कुटुंब मुस्लीम धर्मीय असूनही भगवान श्रीराम यांच्यावरील भजन म्हणतात तर शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे, गीते व कव्वाली सादर करुन मनोरंजन करतात. शहादा शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, दोंडाईचा रस्त्यावरील विश्रामगृह परिसर आदी ठिकाणी त्यांनी कार्यक्रम सादर केले. प्रेक्षकांनी ज्या विषयावर गाणे, पोवाडा, भजन म्हणावयास सांगितले ती कला हे कुटुंब सादर करून लोकांना मंत्रमुग्ध करते.सारंगखेडा, ता.शहादा येथे राज्यातील मोठी यात्रा भरते याची माहिती मिळाल्यानंतर या कुटुंबाने या यात्रेत हजेरी लावून आपली कला सादर करण्याचे ठरविले. यात्रेत काही दिवस हजेरी लावल्यानंतर ते आता दोंडाईचा व शहादा शहरासह परिसरातील गावांमध्ये कार्यक्रम सादर करीत आहेत. या कुटुंबातील कलाकारांची भेट घेतली असता ते म्हणाले की, आपल्या देशात मैलामैलावर बोलीभाषा व कला बदलणारी आहे. विविधता असणाऱ्या या देशात हेवेदावे न करता संस्कृतीला दाद देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, असे त्यांनी सांगितले.