भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:27 IST2019-04-02T12:26:49+5:302019-04-02T12:27:08+5:30
नंदुरबार : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना तळोदानजीक शिर्वे फाट्याजवळ घडली. याबाबत तळोदा पोलिसात गुन्हा ...

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नंदुरबार : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना तळोदानजीक शिर्वे फाट्याजवळ घडली. याबाबत तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपत राया वसावे (२८) रा.वेली, ता.अक्कलकुवा असे मयताचे नाव आहे. वसावे हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३९- ७९०२) जात असतांना त्यांना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन पसार झाले.
शिवाय अंधार असल्यामुळे मयत संपत वसावे यांना वेळीच मदत मिळू शकली नाही. परिणामी त्यांचा मृत्यू झाल्याचे बाब समोर येत आली आहे.
याबाबत जयसिंग दाज्या वसावे रा.वेली, ता.तळोदा यांनी फिर्याद दिल्याने अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार वळवी करीत आहे.