शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरचे दोन तुकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी :  वशहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाजवळील चांदसैली गावानजीक समोरून येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅकटरला ट्रकने ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी :  वशहादा तालुक्यातील शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाजवळील चांदसैली गावानजीक समोरून येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅकटरला ट्रकने धडक दिल्याने ट्रॅकटरचे दोन तुकडे झाल्याची घटना घडली. त्यात सुदैवाने जीवितहानी टळली.सविस्तर वृत्त असे की, मध्य प्रदेशातील मेंद्राणे येथील ट्रॅक्टर (क्रमांक एम.पी. ४६ ए-४८०२) हे शहादा तालुक्यातील पाडळदा येथून ऊस भरून मध्य प्रदेशातील दुर्गा खांडसरी येथे घेऊन जात असताना शहादा-खेतिया रस्त्यावरील चांदसैली गावानजीक कच्चा रस्त्यावरून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एम.एच. १८ ए. ए. ९४०३) ट्रॅकटरच्या उजव्या बाजूने मोठ्या टायरला ठोस मारल्याने अपघात घडला. अपघात एवढा भयानक होता की ट्रॅकटरचे इंजिन जवळ तुटून तुकडे झाले. तसेच ट्राली ट्रॅक्टरपासून वेगळी झाली. अपघात घडताच ट्रक चालक व क्लिनर हे घटनास्थळवरून  ट्रक सोडून पसार झाले. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समजते. ट्रॅक्टर चालक अनिल झुलाल मालचे (२५) यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.काँ.धीरसींग वळवी हे करीत आहेत.

अपघाताचे सत्र चिंताजनकगेल्या १५ दिवसांपासून शहादा-खेतिया रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरु आहे. अवजड वाहने भरधाव वेगाने जात असल्याने यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी ब्राह्मणपुरीनजीक मोटारसायकल अपघातात एका वृद्धाला आपला जीव गमवावा लागला. तसेच लोणखेडा चार रस्त्यावर अज्ञात ट्रक चालकाने पादचारीला चिरडून पोबारा केल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर लहान-मोठे अपघात तर नित्याचे झाले असून अपघाताचे प्रमाण वाहनधारकांना चिंताजनक ठरत आहेत.