लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा-बोरद रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीचालक दोघे जखमी झाल्याची घटना घडली. ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगलसिंग अजबसिंग पाडवी व प्रवीण गंगाराम वसावे असे जखमींची नावे आहेत. तळोदा ते बोरद रस्त्यावरील सलसाडीनजीक हा अपघात झाला. सलसाडीकडून भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरने समोरून येणाºया दुचाकीला (क्रमांक एमएच ३९- एए ६१०९) जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघे फेकले गेल्याने त्यांना जबर दुखापत झाली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक तेथून पसार झाला.याबाबत मंगलसिंग अजबसिंग पाडवी, रा.गणेश बुधावल यांनी फिर्याद दिल्याने तळोदा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक पवार करीत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}