दुचाकी धडकल्या, एकजण ठार, दुसरा जखमी
By मनोज शेलार | Updated: January 17, 2024 17:33 IST2024-01-17T17:33:06+5:302024-01-17T17:33:41+5:30
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

दुचाकी धडकल्या, एकजण ठार, दुसरा जखमी
नंदुरबार : पुढे चालणाऱ्या दुसऱ्या दुचाकीला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार महिला जखमी झाल्याची घटना आमलीबारी, ता. अक्कलकुवा येथे घडली. याबाबत अक्कलकुवा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातात धनसिंग भामट्या वसावे (४८)रा. कुकरमुंडा यांचा मृत्यू झाला तर अनुसयाबाई रामचंद्र वसावे (४८) रा. कुकरमुंडा या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस सूत्रांनुसार, १५ जानेवारी रोजी अक्कलकुवा ते आमलीबारी रस्त्यावर धनसिंग वसावे हे त्यांच्या दुचाकीने (क्रमांक जीजे ०५ जेजे ०९६९) जात असताना ठाणाविहीर नजीक वळणावर त्यांच्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीने (क्रमांक एमएच १८ वाय ५६४५) जबर धडक दिली. त्यात धनगसिंग वसावे यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर अनुसयाबाई या जखमी झाल्या. याबाबत किरण वसावे यांनी फिर्याद दिल्याने अक्कलकुवा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस जमादार महेंद्र जाधव करीत आहे.