शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना अडीच कोटी वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने आकस्मिक निधीतून मंजूर केलेला ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने आकस्मिक निधीतून मंजूर केलेला ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ हा निधी प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर तालुकानिहाय त्याचे वाटप करण्यात आले आहे़ एकूण ७ हजार ७३३ शेतकऱ्यांना हा निधी वितरीत करण्यात आला आहे़आॅक्टोबर महिन्यात महा व क्यार या दोन चक्रीवादळांच्या प्रभावाने जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला होता़ यात सुमारे १० हजार ८१८ शेतकºयांच्या साडेपाच हजार हेक्टर खरीप शेतीपिकांचे नुकसान झाले होते़ या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने साडेतीन कोटी रुपयांची मदत जाहिर केली होती़ यातून जिल्ह्यातील तीन हजार शेतकºयांना पहिल्या टप्प्यात १ कोटी १३ लाख ७६ हजार रुपयांची भरपाई वाटप करण्यात आली होती़ उर्वरित शेतकºयांना दुसºया टप्प्याच्या रकमेची प्रतिक्षा होती़ गेल्या आठवड्यात १४ डिसेंबर रोजी शासनाने जिल्ह्यासाठी २ कोटी ४८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी वर्ग केल्यानंतर सोमवारपासून वाटप सुरु करण्यात आले होते़ यांतर्गत नवापुर तालुक्यात १३ लाख २८ हजार ५००, शहादा ७८ लाख ३८ हजार ८४० तर अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यासाठी प्रत्येकी ७८ लाख ३८ हजार ८३० रुपयांचे वितरण करण्यात आले़ या रकमेतून नवापुर तालुक्यातील ४३, शहादा १ हजार ५५९, अक्कलकुवा ३ हजार २५४ तर धडगाव तालुक्यातील २ हजार ९०० शेतकºयांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली आहे़भरपाईची ही रक्कम खात्यांवर वर्ग झाल्यानंतर आता शेतकºयांचे लक्ष अतीवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईकडे लागले आहे़ जिल्ह्यात तब्बल २० हजार १५५ शेतकºयांच्या १३ हजार हेक्टर जमिनीचे नुकसान झाले होते़ यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ३८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांची भरपाईची मागणी नोंदवली आहे़