शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मिरची आवक वाढीने उलाढालीचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चुरडामुरडा आणि खराब वातावरण यामुळे मिरची उत्पादकांना यंदा मोठा फटका बसला होता. यातून बऱ्याच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चुरडामुरडा आणि खराब वातावरण यामुळे मिरची उत्पादकांना यंदा मोठा फटका बसला होता. यातून बऱ्याच जणांचे मिरची उत्पादन उशिराने बाजारात आले आहे. परिणामी गेल्या आठवड्यापासून नंदुरबार बाजारपेठेत मिरची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवापासून मिरचीची भरमसाठ आवक होत असून पाच ते तीन हजार क्विंटल मिरची आवक दरदिवशी होत आहे.जिल्ह्यात २०२० च्या खरीप हंगामात ६ हजार ८५७ हेक्टर क्षेत्रात मिरचीची लागवड करण्यात आली होती. यात सर्वाधिक ५ हजार ६३५ हेक्टर मिरची लागवड नंदुरबार तालुक्यात करण्यात आली होती. शहादा ९२६, नवापूर ३५, तळोदा ७७, अक्कलकुवा ७३ तर धडगाव तालुक्यात १० हेक्टरवर मिरची लागवड केली गेली होती. लागवडीनंतर काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी खराब हवामानामुळे मिरची झाडांचे नुकसान होऊन उत्पादनापासून शेतकरी मुकले होते. यातून शेतकऱ्यांनी दुबार मिरची लागवड केल्याने नोव्हेंबरपासून मिरची आवक होण्यास प्रारंभ झाला होता. यातून गेल्या आठवड्यापर्यंत ४५ हजार क्विंटल मिरची आवक झाल्याचे सांगण्यात आले होते. शेतकरी नंदुरबार येथील बाजार समितीला सर्वाधिक पसंती देत असल्याने याठिकाणी ही आवक झाली आहे. दरम्यान, ओल्या मिरचीला २ हजार ७०० तर सुक्या मिरचीला ५ ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. यातच २० जानेवारीपासून मिरची आवक वाढण्यास सुरुवात झाली होती. २१ व २२ जानेवारी रोजी थेट पाच हजार क्विंटल मिरची आवक झाली होती. तर २५ रोजी तीन हजार क्विंटल मिरची आवक झाली आहे. या आवकवाढीचा थेट फायदा व्यापारी वर्गाला बसत असून १ लाख क्विंटलच्या आत संपणारा मिरची हंगाम १ लाखाचा टप्पा पार करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने विक्रीसाठी येणारी मिरची ही नंदुरबार, शहादा आणि लगतच्या गुजरात राज्यातून येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यातून दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत असून हंगामाच्या शेवटी हे आकडे कोट्यवधीच्या घरात जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.