शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाढविण्यासाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेच्या व्यवस्थापकांनी पीक कर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे आणि २२ जून रोजी आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक झाली. बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबार्डचे प्रमोद पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक अशोक चाळक आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ.भारुड म्हणाले, बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, पीएम किसान योजना आणि पीक कर्जाच्या लाभार्थींना संवेदनशीलतेने त्या योजनांचा लाभ देऊन संकटाच्या स्थितीत दिलासा देण्याचा प्रयत्न करावा. महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणिकरणाचे काम सुरू करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या असल्याने या कामाला वेग द्यावा. पीएम किसान योजनेच्या लाभार्थींनी कर्जासाठी अर्ज केल्यास कर्ज देणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी बँकेच्या दर्शनी भागावर कर्ज प्रक्रियांची माहिती प्रदर्शित करावी. शासनाच्या विविध योजनांच्या प्रस्तावाना मंजुरी देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत आणि पारदर्शकपणे कामकाजावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. धडगाव, अक्कलकुवा आणि मोलगी भागात बँक सेवा देण्यासाठी प्रयत्न करावे. पीक कर्ज वाटपात उद्दिष्ट पूर्ण करणाºया बँक शाखा व्यवस्थापकाचा सत्कार करण्यात येईल, असेही ते म्हणाले. पीएम गरीब कल्याण योजना व अन्य योजनेच्या लाभार्थींना बँक अधिकृत प्रतिनिधी व इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ८.५ कोटी एवढ्या रकमेचे घरपोच वाटप करण्यात आले. नाबार्डने १७ ठिकाणी ५२ं३ व सोलर ऊर्जेसाठी ४३ लाख आणि ८० मायक्रोएटीएमसाठी १८ लाख मंजूर केल्याची माहिती या वेळी देण्यात आली. बैठकीला विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.२२ जूनला गावनिहाय मेळावेजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे नंदुरबार तालुक्यात टोकरतळे, धुळवद, रजाळे, शनिमांडळ, काकर्दे, कोपर्ली, नाशिंदा व कोकणीपाडा. शहादा तालुक्यात पाडळदा, लांबोळा, कहाटूळ, प्रकाशा, सारंगखेडा, कानडीतर्फे हवेली, रायखेड, फेस, वडाळी व तोरखेडा. नवापूर तालुक्यात वडकळंबी, करंजवेल, चितवी, गंगापूर व भादवड. तळोदा तालुक्यात मोरवड व कढेल. अक्कलकुवा तालुक्यात अक्कलकुवा, मोलगी व रायसिंगपूर. धडगाव तालुक्यात मांडवी या गावांच्या ठिकाणी २२ जून रोजी शेतकºयांना किसान क्रेडीट कार्डच्या आधारे पीक कर्ज वाटपासाठी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.