‘आमचूर’च्या नुकसानीमुळे आदिवासी शेतकऱ्यांचा खरीपही आर्थिक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:02 PM2020-06-22T12:02:29+5:302020-06-22T12:02:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : तालुक्यात विविध भागात १८ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ पेरणीची ही कामे आटोपली ...

Tribal farmers are also in financial crisis due to the loss of 'Amchoor' | ‘आमचूर’च्या नुकसानीमुळे आदिवासी शेतकऱ्यांचा खरीपही आर्थिक संकटात

‘आमचूर’च्या नुकसानीमुळे आदिवासी शेतकऱ्यांचा खरीपही आर्थिक संकटात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : तालुक्यात विविध भागात १८ टक्के खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ पेरणीची ही कामे आटोपली असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे़ दरम्यान तालुक्यात यंदा आदिवासी शेतकऱ्यांना आमचूर उत्पादन न घेता आल्याने खरीप हंंगामासाठीची रक्कम उभी राहिली नव्हती परिणामी शेतकºयांनी किडूक-मिडूक गहाण ठेवत तसेच उसनवारी करुन पेरण्या पूर्ण केल्या आहेत़
दुर्गम भागात आंबा उत्पादन हे आदिवासी बांधवांच्या आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे़ दरवर्षी सुरु होणाºया आंबा हंगामात कैºया सोलून त्या वाळवत त्यांचे आमचूर तयार करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो़ यंदा हवामानातील बदल आणि लॉकडाऊन यामुळे हा उद्योग सुरुच झाला नाही़ झाडांवर कैºयाच न आल्याने घरोघरी आमचूर तयार करण्याची प्रक्रिया झाली नाही़ आमचूर तयार करुन त्याची विक्री केल्यानंतर येणाºया पैश्यातून सर्वच शेतकरी खरीपाचे नियोजन करत होते़ परंतू यंदा आमचूरचे उत्पन्न आले नसल्याने शेतकºयांनी उसनवारीने कर्ज घेऊन तसेच घरातील दागिने गहाण ठेवत बियाणे आणि खतांची व्यवस्था केली आहे़ गेल्या १२ जूनपर्यंत पावसाने हजेरी दिल्याने आशा पल्लवित झालेल्या शेतकºयांनी ज्वारी, उडीद, बाजरी आणि तूरसह इतर धान्य पिकांची पेरणी करण्यास वेग दिला आहे़ परंतू १० दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट दुर्गम भागात आल्यास मोठ्या आर्थिक अडचणींना शेतकºयांना तोड द्यावे लागणार आहे़
यंदा तालुक्यात १९ हजार ७१७ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे़ यातून आजअखेरीस तालुक्यात ३ हजार ६५२ ह्ेक्टर १८ टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ तालुक्यात ४५८ हे्क्टर क्षेत्रात ज्वारी, ३४० हेक्टर क्षेत्रात तूर त्र ६७० हेक्टर क्षेत्रात उडीदाचा पेरा पूर्ण झाला आहे़ यंदा किमान २ हजार ९९४ हेक्टर क्षेत्रात उडीदाचा पेरा होण्याची शक्यता आहे़ पावसाने साथ दिल्यास यात वाढ होणार आहे़ जिल्ह्यात नवापूरनंतर सर्वाधिक उडीद उत्पादन घेणारा तालुका म्हणून धडगाव तालुका ओळखला जातो़
पावसाने योग्य ती साथ दिल्यास उडीद उत्पादनातून शेतकरी आमचूर हंगामात झालेले नुकसान भरुन काढणार आहेत़

Web Title: Tribal farmers are also in financial crisis due to the loss of 'Amchoor'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.