शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यातील १२ टक्के रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

नंदुरबार : जिल्ह्यात ऑक्सिजनची सुविधा, उपलब्ध होणारे बेड आणि इतर सुविधा लक्षात घेता परजिल्ह्यातील तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील ...

नंदुरबार : जिल्ह्यात ऑक्सिजनची सुविधा, उपलब्ध होणारे बेड आणि इतर सुविधा लक्षात घेता परजिल्ह्यातील तसेच गुजरात व मध्य प्रदेशातील अनेक गावांमधील कोरोना रुग्णांची नंदुरबारकडे धाव वाढली आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण पडण्याची शक्यता आहे. १५ दिवसांत २४३ रुग्णांनी येथे उपचार घेतला आहे. अद्यापही ६२ जण दाखल आहेत, तर या काळात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत १२ टक्के रुग्ण येथे उपचार घेत आहेत.

गेल्या महिन्यात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढल्याने बेड मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण सुरत, नाशिक, धुळे येथे उपचारासाठी जात होते. त्यामुळे वेळ आणि पैसादेखील खर्च होत होता. ही बाब लक्षात घेता आणि जनतेची ओरड पाहता जिल्ह्यातच आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार लागलीच कोविड रुग्णालये वाढविण्यात आली. खासगी रुग्णालयांना उपचारासाठी परवानगी देण्यात आली. बेडची संख्या वाढविण्यात आली. ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी दोन ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले. विलगीकरण कक्षांची संख्या वाढली.

गावोगावी अलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातच कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची सोय झाली. त्यामुळे सुरत, नाशिक येथे जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची कमी झाली आहे. याउलट नंदुरबारात बाहेरगावचे रुग्ण दाखल होऊ लागले आहेत. कोरोना रुग्णांसह इतर आजारांचे रुग्णदेखील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

गुजरात व मध्य प्रदेशातीलही जिल्हा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये गुजरातमधील तापी, नर्मदा तसेच मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील अनेक गावांमधील रुग्ण दाखल होण्यास येत आहेत. विशेषत: जिल्ह्याच्या सीमेवरील गावांमधील रुग्णांचा त्यात मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. गेल्या तीन दिवसांत हे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. कारण गुजरात व मध्य प्रदेशातदेखील कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्या भागातील शहरांमधील रुग्णालयांमध्ये बेड मिळत नसल्याने अशा रुग्णांनी नंदुरबारकडे धाव घेतली आहे.

धुळे, नाशिक व जळगाव जिल्हा

परराज्यासह धुळे, नाशिक व जळगाव जिल्ह्यातील रुग्णांचीदेखील धाव नंदुरबारकडे वाढली आहे. जिल्हा रुग्णालयातील सुविधा आणि शहादा व नंदुरबारातील काही मोठ्या कोरोना रुग्णालयांतील सुविधा लक्षात घेता रुग्ण इकडे येत आहेत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अर्थात गेल्या वर्षीदेखील धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रुग्ण नंदुरबारात दाखल होत होते. अनेक रुग्ण बरे होऊन परतलेदेखील.

बरे होण्याचे प्रमाण ७२ टक्के

परजिल्ह्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण तब्बल ७२ टक्के आहे. १५ दिवसांत दाखल २३१ रुग्णांपैकी १६८ रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण पाहता परजिल्ह्यातील रुग्ण नंदुरबारकडे धाव घेऊ लागले आहेत.

ऑक्सिजन सहज उपलब्ध

इतर जिल्ह्यांत रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. नाशिक व सुरत येथे तर ऑक्सिजन बेडच उपलब्ध नाहीत. त्या मानाने नंदुरबार जिल्ह्यात ऑक्सिजनची फारशी कमतरता नाही. दोन ऑक्सिजन प्लांट आधीच सुरू आहेत. लवकरच तिसरा प्लांट सुरू होत आहे. शहादा व तळोदा येथेही मिनी प्लांट तयार होत असून तीन खासगी दवाखान्यांनी प्लांट बसविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ऑक्सिजनबाबत जिल्ह्यात तरी सध्या कुठलीही टंचाई नसल्यामुळे ऑक्सिजन बेडला नियमित व पुरेसा पुरवठा होत असल्याचे चित्र आहे.

स्वॅब देणाऱ्यांचेही प्रमाण वाढले

जिल्ह्यात आतापर्यंत परजिल्ह्यातील ३,७१६ जणांनी स्वॅब दिले आहेत, तर १५ दिवसांत ८४९ जणांनी स्वॅब दिले आहेत. येथील आरटीपीसीआर तपासणी केंद्रात दीड ते दोन दिवसांत स्वॅब अहवाल येत आहेत. याशिवाय रॅपिड चाचणीची जिल्ह्यात १५ पेक्षा अधिक केंद्रे आहेत. त्यामुळेदेखील स्वॅब देण्याचे प्रमाण परजिल्ह्यातील लोकांचे जास्त आहे.