शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर व्यावसायिकांचे व्यवसाय तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

रांझणी : तालुक्याच्या विविध भागांत सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी ९० टक्के शेतकरी ट्रॅक्टरचा वापर ...

रांझणी : तालुक्याच्या विविध भागांत सध्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी ९० टक्के शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करण्यावर भर देणार असून, नांगरटीसाठी भाडोत्री ट्रॅक्टर व्यावसायिकांना संपर्क करत आहेत. या चालकांकडे आधीच तारखा बुक असल्याने, अनेकांना थांबविण्याचे सांगण्यात येत आहे. यंदा चालकांचा व्यवसाय तेजीत आहे.

पातोंडा शिवारात वीजपुरवठा ७ तास खंडित

नंदुरबार : शहरागतच्या पातोंडा गाव शिवारातील विविध रहिवासी वसाहतींमध्ये सुमारे सहा ते सात वीजपुरवठा बंद होता. ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशीच्या वीज बंद असल्याने नागरिक हैराण झाले होते. पातोंडा केंद्रात झालेल्या बिघाडामुळे वीज खंडित झाली होती.

घर दुरुस्ती सुरू, परंतु साहित्याअभावी फिरफिर

नंदुरबार : जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाळ्यापूर्वी घर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. यासाठी प्लास्टीक कागद, काैले, पन्हाळी पत्रे, तसेच इतर साहित्याला मागणी असते, परंतु दुकाने बंद असल्याने त्याची खरेदी करणे जमत नसल्याने, नागरिकांना जुन्याच वस्तूंचा आधार घेत कामे करावी लागत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्रामीण भागात प्लास्टीक नसल्याने मातीच्या धाब्यावर कोरडा चारा वापरत आहेत.

टोप्यांना मागणी

नंदुरबार : शहरात सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होणाऱ्या बाजारपेठेत काही व्यावसायिक रुमाल व टोप्यांची विक्री करत आहेत. यातील टोप्यांना मागणी असून, तापमान वाढ झाल्याने त्यांना मागणी आहे. यंदा मालच उपलब्ध झाला नसल्याने गेल्या वर्षातील मालाची विक्री करत असल्याचे विक्रेत्याने सांगितले.

वाहनांचा उपयोग

नंदुरबार : तालुक्यातील, ढेकवद, शनीमांडळ, आष्टे, नटावद, लहान शहादे व कोपर्ली या केंद्रांवर पंचायत समितीकडून चारचाकी वाहने नियुक्त करण्यात आली आहेत. या वाहनांमधून लसीकरणासाठी नागरिकांना आरोग्य केंद्रांपर्यंत आणण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.

मंदाणे येथे लसीकरण शिबिर

नंदुरबार : शहादा तालुक्यातील मंदाणे येथील सर्व व्यावसायिक व त्यांच्याकडे काम करणारे सर्व कर्मचारी यांच्यासाठी १६ मे रोजी कोरोना चाचणी शिबिर घेण्यात येणार आहे. शिबिरात सर्व व्यावसायिकांनी सहभागी होण्याचे सरपंच विजय सनेर, उपसरपंच अनिल भामरे, डॉ.जितेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी दिनेश पाटील, पोलीस पाटील सुभाष भील यांनी केले आहे. चाचणी न करणाऱ्यांवर कारवाई हाेणार आहे.

गावराणी आंबा आवक

नंदुरबार : शहरातील बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांपासून गावराणी आंबा दिसून येत आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागातून आदिवासी महिला छोट्या आकाराचे आंबे बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. यंदा लाॅकडाऊनमुळे याची आवक मात्र कमी राहण्याची शक्यता आहे.

चाचणीला प्रतिसाद

नंदुरबार : शहरात आरोग्य विभागाने लावलेल्या रॅपिड अँटिजन टेस्ट कॅम्पमध्ये नागरिक भेटी देत चाचण्या करून घेत आहेत. या उपक्रमाला सर्वाधिक पसंती असून, वैद्यकीय कारणासाठी बाहेरगावी जाणारे रॅपिड टेस्टवर भर देत असल्याचे दिसून आले आहे.

फेरीवाल्यांचे हाल

नंदुरबार : लाॅकडाऊनमुळे किरकोळ खाद्यपदार्थ विक्रेते तथा फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद आहेत. यातून त्यांच्या दैनंदिन रोजगारावर परिणाम होत आहे. फेरीवाल्यांच्या घरभाड्यासह इतर अनेक समस्या आहे. फेरीवाल्यांसाठी असलेल्या योजनांची योग्य ती माहिती नसल्याने त्यांचे हाल होत आहेत.

गतिरोधकांची गरज

नंदुरबार : शहरातून जाणाऱ्या शेवाळी-नेत्रंग महामार्ग अर्थात तळोदा रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नव्याने तयार झालेल्या रस्त्यावर गतिरोधकही काढले गेले आहेत. यामुळे या मार्गावर अपघातांची शक्यता आहे. यामुळे पोदार स्कूल, नळवे फाटा येथे गतिरोधकांची गरज आहे.