शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

धो-धो पावसातही तोरणमाळला पर्यटकांनी लुटला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:58 AM

लोकमत न्यूज नेटवर्क तोरणमाळ : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे  ठिकाण  व धार्मिकदृष्टय़ा परिसरात महत्त्वपूर्ण असलेल्या तोरणमाळ ता.धडगाव येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कतोरणमाळ : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे  ठिकाण  व धार्मिकदृष्टय़ा परिसरात महत्त्वपूर्ण असलेल्या तोरणमाळ ता.धडगाव येथे शनिवारी सकाळपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने तोरणमाळ परिसरात धुक्याचे वातावरणासह संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने सीताखाई पॉईंट येथील धबधबा तब्बल सहा वर्षानंतर मनसोक्त कोसळत आहे. तब्बल सहा वर्षानंतर धबधब्यांचा मनमोहक  दृष्याचा मनमुराद आनंद कोसळत्या पावसातही पर्यटकांनी लुटला.सातपुडा पर्वत रांगेतील राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण व पर्यटनस्थळ तोरणमाळ प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे पावसाची संततधार सुरू आहे. शनिवारी पहाटेपासूनच तोरणमाळ व  परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाने रौद्र रूप धारण केले. अवघ्या काही तासातच तोरणमाळ येथील यशवंत तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला. परिसरातील नदी-नाले सर्व जलमय झाले असून सततच्या पावसामुळे या भागातील संपूर्ण सातपुडा पर्वत हिरवागार झाला असून निसर्गाच्या या दैवी देणगीचा लाभ घेण्यासाठी कोसळत्या पावसातही राज्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील पर्यटक तेथे हजेरी लावत आहे. या परिसरात पहिल्यांदा मोठय़ा प्रमाणात आज पाऊस आला. अक्षरश: ढगफुटीसारखे वातावरण येथे निर्माण झाले होते. पर्जन्यमापनाची कुठलीच अधिकृत व्यवस्था नसल्याने नेमका किती पाऊस झाला याची अधिकृत माहिती मिळाली नसली तरी किमान दिवसभरात 150 ते 200 मिलिमीटर पाऊस झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सातपायरी घाटासह कालापाणी आदी भागातील नद्या-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. सातपायरी घाटातील अनेक नैसर्गिक धबधबे आजच्या पावसामुळे ओसंडून वाहू लागले आहेत तर कालापाणीकडे जाणा:या रस्त्यावरील विशाल धबधब्याने मनमोहक रूप धारण केले आहे. द:याखो:यातून व धबधब्यातून कोसळणा:या पाण्यामुळे संपूर्ण पर्वतरांगात एक वेगळेच संगीत सुरू असून तब्बल पाच-सहा वर्षानंतर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदा पाऊस झाल्याने संपूर्ण परिसर न्हाऊन निघाला असून हिरवागार झाला आहे. निसर्गाचे हे मनमोहक रूप आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांनीही येथे मोठय़ा प्रमाणात गर्दी केली आहे. मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून याचा त्रास पर्यटकांनाही सोसावा लागत आहे.दरम्यान, मुसळधार पावसामुळे या भागात शनिवारी सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झालेला होता.

तोरणमाळ परिसरात 2 ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे कोटबांधणी, कालापाणी व सातपायरी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे गेल्या महिन्यात काही दिवस हा रस्ता बंद होता. अतिवृष्टीमुळे 4 ऑगस्टपासून राज्य परिवहन महामंडळाची तोरणमाळ बससेवा  पूर्णत: बंद असल्याने तोरणमाळ येथे जाण्यासाठी पर्यटकांना खाजगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत संपूर्ण घाट रस्त्यात दरडी कोसळण्याच्या किरकोळ घटना घडल्या असल्या तरी वाहतुकीसाठी संपूर्ण रस्ता खुला असल्याने याबाबत पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. मुसळधार पावसामुळे या भागात शनिवारी सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झालेला होता. राज्य परिवहन महामंडळने लवकरात लवकर येथील बससेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांसह पर्यटकांनी केली आहे.