अवकाळीचा धडगावात तीन हजार शेतक:यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:51 PM2019-11-18T12:51:42+5:302019-11-18T12:51:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : परतीच्या पावसानंतर अवकाळी पावसामुळे धडगाव तालुक्यातील 119 गावांमधील तीन हजार पेक्षा अधिक शेतक:यांना फटका ...

Three thousand peasants in a timely manner: | अवकाळीचा धडगावात तीन हजार शेतक:यांना फटका

अवकाळीचा धडगावात तीन हजार शेतक:यांना फटका

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
धडगाव : परतीच्या पावसानंतर अवकाळी पावसामुळे धडगाव तालुक्यातील 119 गावांमधील तीन हजार पेक्षा अधिक शेतक:यांना फटका बसला आहे. त्यात तीन हजार 168 शेतक:यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. 
जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे बाधीत शेतक:यांमध्ये धडगाव तालुक्यातील शेतक:यांचा देखील समावेश आहे. तालुक्यात सतत पाच महिने झालेल्या पावसामुळे व नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे, अशा मागण्या करण्यात येत आहे. या मागण्यांसाठी विविध घटकांमार्फत तहसील कार्यालयावर मोचेही काढण्यात आले. दरम्यान शेतकरी कोंब फुटलेले ज्वारी व मक्याचे कणसे घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चानंतर नायब तहसीलदार राहुल मुळीक यांच्याशी चर्चा करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतक:यांनी सरसकट शेतीचे पंचनामे करावे, वनपट्टेधारक शेतक:यांच्या वनजमिनीवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. सरसकट पंचनामे करण्याचे लेखी आश्वासन जोर्पयत मिळत नाही तोर्पयत ठिय्या आंदोलन करण्याची भूमिकाही शेतक:यांनी  घेतली. या वेळी प्रांताधिकारी गिरासे यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. ज्या शेतक:यांनी विमा काढला आहे, त्या शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे कधी करणार, गुरांना चार उपलब्ध करून द्यावा आदी मागण्याही करण्यात आल्या.

Web Title: Three thousand peasants in a timely manner:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.