शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

जिल्ह्यातील २४ केंद्रांवर १६ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:55 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर १६ हजार विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला़ तळोदा आणि खोंडामळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर १६ हजार विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला़ तळोदा आणि खोंडामळी ता़ नंदुरबार वगळता सर्वच ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती असून परीक्षा बंदोबस्तासाठी यंदा होमगार्ड नसल्याने पोलीस दलाच्या मात्र अडचणी वाढल्याचे दिसून आले़नाशिक विभागीय परीक्षा मंडळाकडून बारावीच्या परीक्षांना मंगळवारी सुरुवात झाली़ परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून १६ हजार ४६९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते़ यासाठी २४ परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती़ आज पहिला पेपर असल्याने सकाळपासूनच पालक व परीक्षार्थी नंबर शोधण्यासाठी परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. परीक्षार्थी एकमेकांना शुभेच्छा देत होते. तर पालक शांततेत पूर्ण पेपर लिहिण्याचा सूचना विद्यार्थ्यांना देत होते. सकाळी दहा वाजेपासून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व विद्यार्थिनींची शिक्षक शिक्षकांकडून तपासणी करण्यात येत होती़ विद्यार्थ्यांचे मोबाईल बॅग इतर मौल्यवान वस्तू , हॅन्ड बॅग पॉकेट किंवा इतर साहित्याला परीक्षा केंद्रावर बंदी करण्यात आलेली होती़ नंदुरबार शहरात चार, नंदुरबार तालुका तीन, तळोदा एक, शहादा सहा, अक्कलकुवा तालुक्यातील चार, नवापुर तालुक्यात पाच तर धडगाव तालुक्यातील एका केंद्रांवर परीक्षा केंद्रावर आधीपासून तयारी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अडचणी आल्या नव्हत्या़ परीक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने सुरळीत पार पडल्याची माहिती देण्यात आली आहे़दोघे डिबारपरीक्षेदरम्यान दुपारी तळोदा येथील न्यू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर दोघा विद्यार्थ्यांवर डायटचे प्राचार्य जालिंदर सावंत यांनी कारवाई केली़ प्राचार्य सावंत यांच्या भेटीदरम्यान केंद्रात विद्यार्थ्यांची झडती घेणे सुरु असताना दोघांकडे कॉपी आढळून आल्यानंतर कारवाई करण्यात आली़दरम्यान गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील होमगार्ड यांना पगार मिळत नसल्याने गृहरक्षक दलाचे जवान कर्तव्यावर नसल्याचे चित्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी दिसून आले़ बारावीची परीक्षा आणि शिवजयंती या दोन्ही अतीमहत्त्वपूर्ण उपक्रमांवेळी बंदोबस्तासाठी होमगार्ड कर्मचारी नसल्याने पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले होते़ मंगळवारी परीक्षा केंद्रांवर पोलिसांवरच जादा भार आल्याने त्यांची दमछाक झाली होती़ याबाबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही़नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी सकाळपासून उपाययोजना करण्यात येत होत्या़ यातून बºयाच ठिकाणी परीक्षा निकोप वातावरणात पार पडल्याचा दावा करण्यात आला़शेतशिवारातून पळाले हुल्लडबाजइंग्रजीच्या पहिल्याच पेपरसाठी प्रविष्ठ झालेल्या ६ हजार ४५९ पैकी १६ हजार २११ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ सर्व २४ केंद्रातून २५६ विद्यार्थी गैरहजर होते़शिक्षण विभागाने यंदा कॉपीमुक्त अभियान राबवल्याने त्याचा परिणाम दिसून आला परंतू खोंडामळी ता़ नंदुरबार येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाबाहेर हुल्लडबाजी झाल्याने पळापळ झाली़ कॉपी पुरवण्यासाठी याठिकाणी मोठी गर्दी जमली होती़ या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीसांकडून कारवाई होताच अनेकांनी मोटारसायकली सोडून पळ काढला़ यातून शाळेच्या मागे जागोजागी दुचाकी पडून असल्याचे दिसून आले़ अनेकजण शेतशिवारातून पळत सुटले होते़