शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यात बँक फोडण्यात चोरटे अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरात एकाच रात्रीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह सात दुकाने फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरात एकाच रात्रीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह सात दुकाने फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामुळे दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही सर्व दुकाने चिनोदा रस्त्यावरील आहेत. एका गॅरेजमधून सहा हजार ३०० रुपये किमतीचे स्पेअर पार्ट लांबवले.याबाबत वृत्त असे की, शहरातील चिनोदा रस्त्यावरील महाजन स्टील ट्रेडर्स, आदर्श आॅटोमोबाईल, दीपक सबमर्सिबल, महाकाली आॅटोपार्ट, स्वामी आॅटो, अंजना प्रोव्हीजन, वरद मेडिकल व महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह इतर दुकानांच्या शटरचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. कचरा डेपोसमोरील महाजन स्टील ट्रेडर्स यांचे दोन गाळे दुकानाचे आहेत. त्यांच्या दोन्हीही दुकानाचे शटर सकाळपर्यंत उघडेच होते. काही दुकानांचे कुलूप तोडून आत चोरट्यांनी आत शिरकाव केला. यादरम्यान कोणत्याच दुकानात रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागली नाही. त्यामुळे राग व्यक्त करीत चोरट्यांनी आदर्श आॅटोमोबाईल या मोटारसायकल गॅरेजमधील सामान बाहेर फेकून दिला. तर गॅरेजमधील मोटारसायकलीचे स्पेअर पार्ट, आॅईल, मॅकव्हील व इतर साहित्य असा सहा हजार ३०० रुपयांचा सामान चोरट्यांनी लांबवला. काही समान दुकानासमोर फेकलेला आढळून आला. कचरा डेपोलगत असलेल्या अंजना प्रोव्हीजनचा लोखंडी दरवाजा वाकवण्यात आला होता. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. परंतु कुलूप तुटले नाही. दीपक सबमर्सिबल या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेराची दिशाही चोरट्यांनी वळवली. या सर्वच दुकानांची प्राथमिक पाहणी पोलिसांकडून करण्यात आली आहे.तळोद्यातील पहिलीच घटनातळोदा शहरात प्रथमच एकाच रस्त्यावरील एकाच रात्रीत सात ते आठ दुकाने व एक बँक फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला. यामुळे नागरिकांची मालमत्ता व संपत्ती सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. बँकेच्या दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु कुलूप तुटले नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शहरातील बँकेचे कुलूप तोडण्याचा चोरट्यांनी प्रथमच प्रयत्न केल्याची घटना घडली.याबाबत नासीर पिरखा पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार राजू वानखेडे हे करीत आहेत.