दोन बोट व दहा बाईक अम्ब्युलन्स मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:46 AM2019-09-15T11:46:09+5:302019-09-15T11:46:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी दोन बोट अॅब्युलन्स आणि ...

There will be two boat and ten bike ambulances | दोन बोट व दहा बाईक अम्ब्युलन्स मिळणार

दोन बोट व दहा बाईक अम्ब्युलन्स मिळणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी दोन बोट अॅब्युलन्स आणि दहा बाईक अॅम्ब्युलन्स देण्यात येतील, अशी ग्वाही निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार हिना गावीत, निती आयोगाचे सल्लागार सदस्य राकेश रंजन, वित्तसेवा विभागाचे सहसचिव बी.के.सिन्हा, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आदी उपस्थित होते. अमिताभकांत म्हणाले, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे. आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केल्यास जिल्ह्याचा सर्वांगिण विकास शक्य आहे. त्यासाठी अधिका:यांनी स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने विशेष प्रय} करावेत. त्यासाठी निती आयोगातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. 
जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र आणि शिक्षक प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी आयोगातर्फे सहकार्य करण्यात येईल. सीआयआयतर्फे रोजगार मार्गदर्शनाबाबत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. 
आदिवासी जिल्हा असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांमधून सेंट्रल किचनच्या माध्यमातून पौष्टीक आहार उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागाशी चर्चा करण्यात येईल. जिल्ह्याने निती आयोगाच्या मानांकनात  चांगली प्रगती केली असून 48 वरून 34 व्या स्थानावर ङोप घेतली आहे. येत्या सहा महिन्यात सर्व 49 निर्देशांकांत चांगली प्रगती करीत जिल्ह्याला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रय} करावे, असे आवाहन त्यांनी केले. 
निती आयोगातर्फे निश्चित निर्देशांकांत होणा:या प्रगतीच्या आधारे मानांकन करण्यात येत असून प्रथम येणा:या जिल्ह्याला 10 कोटी, द्वितीय पाच कोटी व इतर पाच निर्देशांकांत पुढे असलेल्या जिल्ह्याला प्रत्येकी तीन कोटी रुपये विकासकामांसाठी देण्यात येतात. 
बदल घडवून आणण्यासाठी हे प्रोत्साहन आहे. हे आव्हान स्विकारत जिल्ह्यातून सिकलसेल अॅनिमिया हद्दपार करण्यासाठी लोकचळवळ उभी करावी आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्याला मानाचे स्थान मिळवून द्यावे, असे कांत म्हणाले.
त्यांच्या हस्ते नाबार्ड एफआयएफ अंतर्गत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फिरत्या एटीएमचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या हस्ते लुपीन ह्युमन वेल्फेअर अॅण्ड रिसर्च फाऊंडेशनमार्फत बेरोजगारांना देण्यात येणा:या भाजीपाला विक्री व नास्ता सेंटरच्या लोटगाडय़ांचेही उद्घाटन करण्यात आले.  स्वच्छता रथाला हिरवी ङोंडी दाखविण्यात आली. 

बँकांच्या समस्यांची चर्चा
सहसचिव सिन्हा म्हणाले, बँकांकडून देण्यात येणा:या सुविधांबाबत समस्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात एक टीम पाठविण्यात आली आहे. त्या टीमच्या अहवालानंतर आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. दुर्गम भागात सेवा देताना बँकांना समस्या असल्यास त्यांनी केंद्र सरकारकडे मांडावी, त्याबाबत त्वरीत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. बँकांना कनेक्टीव्हीटीची समस्या असेल तिथे व्हीसॅटद्वारे कामकाज करण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत. बँकांनी जनधन खात्याचा उपयोग चांगली सेवा देऊन व्यवसाय वाढविण्यासाठी करावा, असेही त्यांनी सांगितले.

300 मॉडेल शाळांसाठी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी 
जिल्ह्यात 300 मॉडेल शाळा उभ्या करण्यात येणार असून त्यासाठी आयोगाने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी केले. तोरणमाळमध्ये आदिवासी म्युङिाअम आणि तेथील विकास आराखड्याबाबत निती आयोगाने सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. लुपीन फाऊंडेशन, पिरॅमल फाऊंडेशन आणि युनिस्कोच्या प्रतिनिधीने यावेळी सादरीकरणाद्वारे उपक्रमांची माहिती दिली. तत्पूर्वी कांत यांनी जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने विविध घटकांशी चर्चा केली. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, कांतीलाल टाटीया तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा आढावा घेत सामाजिक संघटनांकडून त्यांनी माहिती जाणून घेतली. आणखी काय उपक्रम व योजना राबविता येतील याबाबत त्यांनी पडताळणी करून घेतली. 
 

Web Title: There will be two boat and ten bike ambulances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.