नंदुरबारातील कंटेनमेंट झोनमध्ये झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 12:08 PM2020-06-29T12:08:41+5:302020-06-29T12:08:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात पुन्हा नवीन ३ प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. यामुळे प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या ...

There was an increase in the containment zone in Nandurbar | नंदुरबारातील कंटेनमेंट झोनमध्ये झाली वाढ

नंदुरबारातील कंटेनमेंट झोनमध्ये झाली वाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात पुन्हा नवीन ३ प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. यामुळे प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या शहरात ८ झाली आहे. अशा ठिकाणी आरोग्य विभाग व पालिकेतर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत.
नंदुरबारात एकाच दिवशी अर्थात बुधवारी ३६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यातील ७ जण हे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी होते. उर्वरित २९ जण हे विविध भागातील आहेत. रुग्ण आढळलेले नवीन तीन भाग व पूर्वीचे पाच भाग अशा आठ ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. त्यात मंगळ बाजारातील सिद्धी विनायक चौक, गिरिविहा कॉलनी, सिंधी कॉलनी, धर्मशांतीनगर, कोकणीहिल, ज्ञानदिप सोसायटी, लक्ष्मीनगर, मन्यार मोहल्ला यासह इतर भागांचा समावेश आहे. बुधवारी मंगळबाजारातील १२, गिरिविहार कॉलनीतील ८, जिल्हा रुग्णालयातील ७, ज्ञानदिप सोसायटीतील ५, कोकणीहिल भागातील २, घोडापीर मोहल्ला भागात १ व पायलनगर भागात ए असे रुग्ण आढळून आले होते.
ज्या भागात आढळलेला रुग्ण आधीच क्वॉरंटाईन असेल अशा भागात प्रतिबंधीत क्षेत्र केले जात नाही. अशा ठिकाणी केवळ संबधीत व्यक्तीच्या घरच्या लोकांना होम क्वॉरंटाईन केले जाते. दररोज वाढणारे प्रतिबंधीत क्षेत्रामुळे मात्र दैनंदिन व्यवहारावर परिणाम दिसून येत आहे.

Web Title: There was an increase in the containment zone in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.