शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

गरिबाच्या फ्रिजला यंदा मागणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST

उन्हाळा सुरू झाला की, सर्वसामान्य नागरिक थंडगार पाण्यासाठी माठाची खरेदी करतात. त्यातून काही प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. परिणामी ...

उन्हाळा सुरू झाला की, सर्वसामान्य नागरिक थंडगार पाण्यासाठी माठाची खरेदी करतात. त्यातून काही प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. परिणामी माठनिर्मिती करणाऱ्या कुंभार समाजातील कुटुंबीयांना रोजगार उपलब्ध होत असतो. विशेष म्हणजे बदलत्या काळानुसार फ्रिज आला असला तरी माठातील पाणी चवीला चांगले असते. तसेच आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही; म्हणून नागरिक माठच खरेदी करतात. ग्रामीण भागातील नागरिक थंड पाण्यासाठी सर्वाधिक मातीच्या माठाचा वापर करतात.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत. त्यामुळे ग्राहक घराबाहेर पडणे पसंत करीत नाहीत. परिणामी आठवडेबाजारही बंद असल्याने खरेदीसाठी कोणीही येत नसल्याने दिसून येत आहे.

माठनिर्मिती करणाऱ्यांनी माती आणि भुस्सा मोठ्या प्रमाणात खरेदी करून माठांची निर्मिती केली आहे; परंतु ग्राहकांकडून मागणीच नसल्याने हे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे यंदा तरी केलेला खर्च निघेल की नाही, अशी भीती व्यक्त होत आहे.

दिवसेंदिवस उन्हाची दाहकता वाढत आहे. गोरगरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठांची शहरासह ग्रामीण भागांत दुकाने लागली आहेत. मात्र ग्राहक खरेदी करीत नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परिणामी हा व्यवसाय संकटात सापडला आहे. शहरातील कुंभार गल्ली परिसरातील माठविक्रेते हे स्वतः माठ तयार करून शहरी व ग्रामीण भागांत विक्री करतात. तसेच इतर विक्रेत्यांनाही पुरवठा करतात. बहुतांशजण पिढ्यान‌्पिढ्या हा व्यवसाय करीत आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य या व्यवसायासाठी राबतात. उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत असतो. मात्र कोविड महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावात हा व्यवसाय संकटात सापडला असल्याने छोटे-मोठे व्यावसायिक विक्रेते आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, अशी चिंता लागली असल्याचे माठविक्रेत्यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटामुळे व्यवसाय ठप्प

माठांची निर्मिती करून विक्री करणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. गेल्या चार पिढ्यांपासून आम्ही हा व्यवसाय करतो. आमची मुले दुसऱ्या व्यवसायात होती; परंतु कोरोनाच्या संकटामुळे ती पुन्हा आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे परतली आहेत.

गेल्या वर्षी उन्हाळ्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने हा व्यवसाय पूर्णपणे डबघाईस आला होता. यंदाही कोविड महामारीच्या प्रादुर्भावामुळे उपासमारीचे चटके सोसावे लागतील की काय, अशी भीती माठविक्रेत्यांनी व्यक्त केली.

- कांतिलाल कुंभार

शेती अथवा नदीकाठावरून माती आणून तिला राख लावून तिला आकार देणे व भट्टी तापविणे अशीही माठ बनविण्याची प्रक्रिया आहे; परंतु कोरोनाच्या संकटामुळे माठविक्रीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे खर्चही निघणार की नाही, अशी स्थिती आहे.

- छगन कुंभार