शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लक्षणे नाहीत...पण तापाने रुग्ण फणफणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:31 IST

कोरोना संसर्गाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांनाही आता कोरोनाचे गुणधर्म चांगल्याप्रकारे कळू लागले आहेत. पूर्वी साधा ताप ...

कोरोना संसर्गाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नागरिकांनाही आता कोरोनाचे गुणधर्म चांगल्याप्रकारे कळू लागले आहेत. पूर्वी साधा ताप असला, तरी कोरोनाची भीती वाटत होती. खासगी डॉक्टर पटकन कोरोना तपासणी करण्याचा सल्ला देत होते. कोरोना तपासणी टाळण्यासाठी अनेकजण दुखणे अंगावर काढत होते. मागील वर्षभराचा अनुभव पाठीशी असल्याने नागरिक आता न घाबरता जवळ असलेल्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रांवर रांगा लावून टेस्ट करीत आहेत. दररोज शेकडो तपासण्या करण्यात येत आहेत. त्यात अर्ध्याहून जास्त नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत. एकीकडे रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले असले, तरी अर्ध्याहून अधिक ग्रामीण भागातील नागरिकांना सुरुवातीला कणकण, नंतर किरकोळ स्वरूपाचा ताप, तर काहींना फक्त सर्दी, अंग दुखणे यासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. शहरातील प्रत्येक खासगी डॉक्टरकडे दिवसभरातून किमान १०० रुग्ण व्हायरल आजाराचे येत आहेत. डॉक्टर रुग्णांना नेहमीप्रमाणे व्हायरल आजार समजून औषधोपचार करीत आहेत. तीन ते चार दिवसानंतरही ताप कमी न झाल्यास कोरोना तपासणी करण्यात येत आहे. त्यात बहुतांशी नागरिक निगेटिव्ह येत आहेत. कितीही औषध, गोळ्या घेतल्या तरी, रुग्णांना अशक्तपणा आणि अंग दुखणे थांबायला तयार नाही. ज्या पद्धतीने रुग्ण येत आहेत, त्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

धूर फवारणीची गरज

शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत आहे. परंतु खासगी रुग्णालयेही हाऊसफुल्ल असून, गोरगरीब जनतेची पिळवणूक होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात होणाऱ्या साथीच्या आजाराला आळा घालण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींमार्फत उपाययोजना करून धूर फवारणी करण्यात यावी. जेणेकरून काही प्रमाणात साथीच्या आजाराला आळा बसेल, अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेकडून करण्यात येत आहे.

वातावरणातील बदलांमुळे ग्रामीण भागात ताप असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. डायरिया, सर्दी, डोकेदुखी व अशक्तपणा असलेल्या रुग्णांचीही संख्या वाढलेली दिसून येते. त्याचबरोबर साथीचे आजारही मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. तीन ते पाच दिवसांमध्ये ताप कमी न झाल्यास रुग्णांनी पटकन कोरोना टेस्ट करून घ्यावी.

-डॉ. हर्षल पाटील, सुलतानपूर, ता. शहादा