शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाच्या ऑनलाइन नोंदणीबाबतही अनेक अडचणी; १८ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त प्रभाव तरुणवर्गामध्ये दिसून येत आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळ्याच व्यक्तींमध्ये कोरोनाची ही ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त प्रभाव तरुणवर्गामध्ये दिसून येत आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सगळ्याच व्यक्तींमध्ये कोरोनाची ही दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याने केंद्र सरकारने १८ वर्षांपुढील व्यक्तींचेही लवकरात लवकर लसीकरण करण्यासंबंधी सूचना राज्य शासनाला दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने १ मेपासून १८ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण करण्यास सुरुवात केली असली तरी प्रत्यक्षात शहादा तालुक्यातील जयनगरसह अनेक गावांमध्ये १८ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण होत नाहीये. लसीकरण केंद्रावर गेल्यावर ४५ वर्षांच्या पुढील व्यक्तींनाच प्राधान्य मिळत असून, १८ वर्षांपुढील व्यक्तींचे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरण तर होत नाहीये. शिवाय त्यांचे केव्हा लसीकरण होईल, याबाबतही ठोस उत्तर तरुणांना भेटत नाहीये.

सोशल मीडियाचा उपयोग करण्यात तरुणवर्ग तरबेज असून, ऑनलाइन नोंदणी करून जिल्ह्यात जिथे १८ वर्षाच्या पुढील व्यक्तींचे लसीकरण केंद्र असेल, तिथे जाऊन आपणही लसीकरण करून घ्यावे, यानुसार तरुणवर्ग ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र प्रत्यक्षात ऑनलाइन नोंदणी होत नसून प्रत्येक वेळी बुकिंग फुल्ल असेच दिसत असते. स्पॉट रजिस्ट्रेशन बंद करण्यात आल्याने लोकांना ऑनलाइन नोंदणी करण्याबाबत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे ऑनलाइन स्लॉट कधी ओपन होतो आणि कधी पूर्ण होतो हेच कळत नाही. ऑनलाइन स्लॉट ओपन होऊन १० ते १२ मिनिटांत बुकिंग फुल्ल होते. त्यामुळे नेमके बुकिंग कधी करावे हेच समजत नाहीये.

याचा फटका ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली नाही, त्यांना लसीकरण करण्यात खूप अडचणी येत आहेत. जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हीच समस्या येत आहे. यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर तणावाचे वातावरण दिसून येत आहे. अशा लसीकरणासंदर्भातील नोंदणीच्या समस्या सोडविण्यासाठी ऑनलाइन स्लॉट केव्हा ओपन होतो, ऑनलाइन आणि ऑफलाइनचे बूथ वेगळे ठेवणे तसेच १८ वर्षांपुढील व्यक्तींचेही लसीकरण लवकरात लवकर सुरू करायला हवे, अशी मागणी जयनगरसह परिसरातील गावांमधील तरुणवर्गाकडून होत आहे.