शाळेच्या आवारातून विद्युत मोटारची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 21:29 IST2020-10-19T21:29:42+5:302020-10-19T21:29:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शाळेच्या आवारातून चोरट्यांनी साडेदहा हजार रुपये किंमतीची विद्युत मोटार चोरून नेल्याची घटना तळोदा येथील ...

शाळेच्या आवारातून विद्युत मोटारची चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शाळेच्या आवारातून चोरट्यांनी साडेदहा हजार रुपये किंमतीची विद्युत मोटार चोरून नेल्याची घटना तळोदा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या आवारात घडली. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोदा तालुक्यातील तऱ्हावद येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय चालविले जाते. सद्या कोविडमुळे विद्यालय बंद आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी शाळेच्या आवारात चोरी केली. शाळेच्या पाठीमागे असलेल्या कुपनलिकेतील सबमर्शीबल पाण्याची मोटर केबल चोरट्यांनी चोरून नेली. साडेदहा हजार रुपयांची मोटार व १२ हजार रुपयांची केबल असा एकुण साडेबावीस हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले.
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा रतिलाल पाटील यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रकाश चौधरी करीत आहे.