शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

शुक्रवारपासून नंदुरबारात रंगणार नाट्योत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा सुरु होत आहे. यात राज्यभरातून २१ नाट्यसंस्था सहभागी होणार आहे.नांदुरबारात ३ ते ५ जानेवारी या कालावधीत राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर उर्फ जिभाऊ यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा अयोजित केल्या आहे. यासाठी महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमळनेर, जळगांव, भुसावळ, धुळे, चोपडा, एरंडोल, उल्हासनगर येथील नाट्यसंस्था शिवाय इंदौरहुनही सहभागी होणार असून २१ एकांकीकांची नोंदणी झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा कल्चरल अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, दिग्दर्शक शाम रंजनकर, उद्योजक आनंद जैन, किरण तडवी, मिलिंद पहुरकर, शितल पटेल, नवोदय विद्यालयाचे सुरेंद्र देवरे, नगरसेवक रविंद्र पवार, डॉ.राजकुमार पाटील, संजय चौधरी, पत्रकार रमाकांत पाटील, रणजीत राजपूत, नरेश नानकानी, रोटरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ५ जानेवारी मागील परिक्षकांचा परिसंवाद होणार आहे.यात अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गजवी, गंगाराम गवाणकर, प्रशिक्षक शिवदास घोडके, अभिनेता आत्माराम बनसोडे, अभिनेत्री निला गोखले, नाटककार कुंदा निलकंठ, अभिनेता वीरा साथीदार, अ‍ॅकेडमी आॅफ थिएटर आर्टस् विद्यापीठाचे डॉ.मंगेश बनसोडे, प्रसारण मंत्रालयाचे डॉ.जितेंद्र पानपाटील, शशिकांत बºहाणपूर आदी सहभागी होणार आहे. तर दुपारी २ वाजता बक्षिस वितरण होणार आहे.तीन दिवसात सादर होणाऱ्या एकांकीकांचे परीक्षण नाटककार अजित भगत, नाट्य दिग्दर्शक दत्ता पाटील, नाटककार रविंद्र लाखे हे करणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हावासियांना एकांकीकेची मेजवानीच मिळणार आहे. याचा नाट्यरसिकांनी आनंद घ्यावा, असे आवाहन नागसेन पेंढारकर, मनोज पटेल, मनोज सोनार, राजेश जाधव यांनी केले आहे.४जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दिला जाणारा ‘दिपस्तंभ’ पुरस्कार यंदा शहादा येथील रंगश्री गृपचे संस्थापक ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ.शशांक कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे.४स्पर्धेदरम्यान प्रसिद्ध हास्य कलाकार विलासकुमार शिरसाठ यांची तुफान स्टॅण्डअप कॉमेडीचा कार्यक्रम ५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.४दि. ५ जानेवारीलाच सायंकाळी ७ वाजता डॉक्टरांनी तयार केलेला हिंदी लघुपट ‘काश’ याचे प्रदर्शन होणार आहे.