आवडत नाही म्हणून विवाहितेला घराबाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 18:27 IST2023-04-15T18:27:22+5:302023-04-15T18:27:31+5:30
रमाकांत पाटील नंदुरबार : आवडत नाही व कुटुंबाला शोभत नाही म्हणून विवाहितेचा छळ करून तिला घरातून काढून दिल्याची घटना ...

आवडत नाही म्हणून विवाहितेला घराबाहेर काढले
रमाकांत पाटील
नंदुरबार : आवडत नाही व कुटुंबाला शोभत नाही म्हणून विवाहितेचा छळ करून तिला घरातून काढून दिल्याची घटना वडझाकण, ता. अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी विसरवाडी पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेही, ता. नवापूर येथे राहणारी कौशल्याबाई दिनेश वळवी (३१) या महिलेचा विवाह वडझाकण, ता. नवापूर येथील दिनेश रायसिंग वळवी यांच्याशी झाला होता. विवाहानंतर अर्थात जानेवारी २०२३ पासून ते आजपर्यंत कौशल्याबाई यांना सासरची मंडळी विविध कारणांनी छळ करीत होती. पती दिनेश याने तु आवडत नाही म्हणून त्रास देणे सुरू केले. घरातील इतर मंडळींनी त्यांना तु कुटुंबाला शोभत नाही म्हणून टोमणे मारणे सुरू केले. त्यातून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. शेवटी त्यांना घरातून हाकलून दिले. या सर्व प्रकाराला कंटाळून कौशल्याबाई वळवी यांनी फिर्याद दिल्याने दिनेश रायसिंग वळवी (३३), रायसिंग गोमा वळवी (५५), सयूबाई रायसिंग वळवी (५०), मोग्या फत्तू वळवी (३३) सर्व रा. वडझाकण, ता. नवापूर यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस जमादार नरेंद्र वळवी करीत आहे.