विद्यार्थिनींसाठी आनंददायी शाळेचे निर्मिती करणारी शिक्षिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:51 IST2019-09-05T14:51:36+5:302019-09-05T14:51:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथील जिल्हा परिषद कन्या शाळा म्हणजे विद्यार्थिनींचं आनंदवन आह़े ही आनंददायी शाळा ...

विद्यार्थिनींसाठी आनंददायी शाळेचे निर्मिती करणारी शिक्षिका
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील रनाळे येथील जिल्हा परिषद कन्या शाळा म्हणजे विद्यार्थिनींचं आनंदवन आह़े ही आनंददायी शाळा निर्मितींच श्रेय जातं शिक्षिका उज्ज्वला पाटील यांना शिक्षक-पालक आणि विद्यार्थी यांचा त्रिवेणी संगम असलेली ही शाळा आता राज्यस्तरावर ओळखली जात आह़े
9 वर्षापूर्वी रनाळे केंद्रातील सर्वच बाबीत मागे असलेल्या या शाळेचा कायापालट होण्याचा प्रवास अतिशय रंजक असाच आह़े या शाळेला आदर्श मॉडेल डिजीटल स्कूलचा दर्जा मिळवून देणा:या येथील शिक्षिका उज्ज्वला रंगनाथ पाटील यांना नुकताच राज्य आदर्श पुरस्कार जाहिर झाला आह़े शिक्षिका पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला असता, सातत्याने केलेले ज्ञानदान आणि उपक्रमातील सातत्य यातून हे शक्य झाल्याचे स्पष्ट झाले आह़े जून 2011 मध्ये उज्ज्वला पाटील यांची शाळेवर नियु्क्ती करण्यात आली होती़ त्यावेळी चार शिक्षकी शाळा असून गावातील अनेकांनी त्यांच्या मुलांना नंदुरबारसह रनाळे परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेऊन दिला होता़ यातून शाळेत विद्यार्थिनींची संख्या ही नगण्य होती़ ज्या विद्यार्थिनी शिक्षण ेघेत होत्या त्यांचे पालक शाळेच्या कोणत्याही कार्यक्रमास सहभाग घेत नव्हत़े विद्यार्थिनींची गैरहजेरी वाढून गुणवत्ताही खालावली होती़ अप्रगत विद्यार्थिनींची संख्या अधिक असल्याने ेकेंद्र प्रमुखांनी शाळा दत्तक घेतली होती़ अशा स्थितीत येथे उज्ज्वला पाटील शिक्षिका तर त्यांचे पती अमृत पाटील हे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होत़े मुख्याध्यापक अमृत पाटील आणि केंद्रप्रमुख रजनी सगळे यांचे मार्गदर्शन घेत उज्ज्वला पाटील यांनी विद्यार्थिनींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली़ वाचन-लेखन, गणिती क्रीया आणि इंग्रजी अध्यापनावर त्यांनी जास्तीत जास्त भर दिला़ वर्षभर शैक्षणिक साहित्य वापरून अधिक तयारी करवून घेतली. शाळेतील इतर रजिस्टर, रेकॉर्ड इतर शिक्षकांच्या मदतीने अपडेट केले. अध्यापनाव्यतिरिक्त सहशालेय उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर व क्रीडा स्पर्धा तसेच सहलीचे आयोजन केले गेल़े यामुळे विद्यार्थिनींमध्ये शाळेबाबत गोडी निर्माण होऊन त्यांची शाळेत हजेरी वाढू लागली़ चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी आणि शाळेच्या दिवशी संध्याकाळी जादा तास सुरू केले. शाळेतील हा बदल पालकांनाही जाणवू लागल्याने त्यांनी शिक्षिका पाटील यांच्या या प्रयत्नांना प्रतिसाद दिला़
शाळेतील भौतिक बदलांसाठी शिक्षिका उज्ज्वला पाटील यांनी मोठी मेहनत घेतली होती़ यातून शिक्षक आणि पालकांच्या लोकवर्गणीतून नंदुरबार जिल्ह्यातील पहिला डिजीटल वर्ग निर्माण करण्याचा मान रनाळे कन्या शाळेने पटकावला आह़े 1 लाख 25 हजार लोकवर्गणी व विशेष निधी यातून संगणक,प्रिंटर मशीन, लॅपटॉप, साउंड सिस्टीम, यासह प्रगत अध्ययन साहित्याची खरेदी केली होती़ यातून विद्यार्थिनी ह्या प्रगत होऊन त्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली़ परिणामी इंग्रजी माध्यमाकडे गेलेले पालक मुलींना घेत पुन्हा शाळेत आल़े
गत 9 वर्षात उज्ज्वला पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी पहिली वर्ग अध्यापन, हस्ताक्षर माङो सुंदर, ई-लनिर्ंग, सांस्कृतिक कार्यक्रम, निसर्गपुरक उपक्रम, अभ्यासाचा मॅसेज पालकांच्या मोबाईलवर, सामाजिक उपक्रम, सोशल मीडिया चा वापर, एक पत्र व्यसनमुक्तीसाठी, कब-बुलबुल शिबिर, मतदान जनजागृती रॅली, योगासन स्पर्धा, दप्तराविना शाळा, आकाश कंदील बनवणे, स्वच्छता पंधरवाडा साजरा करणे, महिला मेळावा घेऊन महिला सक्षमीकरण करणे, विविध नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करणे, सहलींचे आयोजन करून क्षेत्र भेटी आणि पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात येत़े सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणा:या शिक्षिका उज्ज्वला पाटील विद्यार्थिनीप्रिय शिक्षिका आहेत़ केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता विद्यार्थिनींसोबत मैत्रीचे विजोड असे नाते निर्माण करुन त्यांच्यात शिक्षणाची ज्योत तेवत ठेवत आत्मविश्वास निर्माण करण्याचे श्रेय त्यांना जात़े