शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

वीज तारांमुळे तळोदेकरांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 13:17 IST

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष : एकाचा बळी गेल्यानंतरही सुधारणा नाही

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 27 : वीज वितरण कंपनीच्या हायटेन्शन लाईंनने शहरातील काही भागातील इमारतींना अक्षरश: स्पर्श केला असल्याचे चित्र दिसून येत असून, येथील रहिवाशी जीव मुठीत घेवून वावरत आहेत. याबाबत तेथील  नागरिकांनी सातत्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांकडे तक्रारी करूनही त्या तारा हटविण्याबाबत साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या तारांमुळे आधीच एकाचा जीव गेला आहे. अजून आणखीन बळी जाण्याची वाट कंपनी अधिकारी पाहात आहे का? असा संतप्त प्रश्न संबंधित रहिवाशांनी उपस्थित केला आहे. निदान वरिष्ठ प्रशासनांनी तरी याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शहरातील ग्राहकांच्या वीजपुरवठय़ासाठी तलावडी जवळील 133 के.व्ही. उपकेंद्रातून वीजपुरवठा जोडण्यात आला आहे. याशिवाय तहसील परिसर, साकरलालनगर, विमलनगर, भोईवाडा, कुंभारवाडा, कॉलेज रस्ता, या भागातून वीज कंपनीची हायटेन्शन लाईनदेखील गेली आहे. परंतु या लाईनच्या तारा प्रचंड लोंबकळल्या आहेत. त्या अक्षरश: या भागातील इमारतींना स्पर्श करीत असल्याचे चित्र आहे. साहजिकच हे रहिवाशी छपरावर, स्लॅबवर चढतांना आपला जीव मुठीत घेवून वावरत आहेत. हवेमुळे अथवा झाडांच्या फांद्यामुळे तारा एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा मोठ-मोठय़ा चिंग्या उडत असतात. त्याचबरोबर शॉर्टसर्कीटमुळे वीजेची उपकरणेदेखील सतत जळण्याचा प्रकार घडत असतो. विशेष म्हणजे तहसीलरोड कडील भागात तर तारांचे विदारक चित्र आहे. या भागात सर्वच शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे कामकाजासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नाही. आधीच तीन-चार वर्षापूर्वी या भागातच एकाचा जीव तारांना स्पर्श झाल्यामुळे गेला होता. तरीही वीज वितरण कंपनीने अजूनही तारा हटविलेल्या नाहीत. वास्तविक येथील रहिवाशांनी हायटेन्शन लाईन हटविण्यासाठी कंपनीच्या संबंधित कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या उपरांत कंपनीच्या अधिका:यांना प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले आहे. संबंधीत अधिका:यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे. प्रस्तावदेखील पाठविला आहे, असे वायदे देत असल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक ही एल.एन.की. लाईन आहे. तिचा प्रवाहदेखील 11 हजार होल्टचा असतो. साहजिकच सावधानता बाळगण्याची आवश्यकता असतांना वीज कंपनीने रहिवाशांच्या सुरक्षिततेकडे उदासिन धोरण घेतले आहे. एवढेच नव्हे तेथे ब्रॅकेट बसविण्याची तसदीदेखील घ्यायला तयार नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. निदान वरिष्ठ प्रशासनाने तरी याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची रहिवाशांची मागणी आहे.