शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

वाळू डंपर अडविल्याच्या वादातून तलाठी महिलेस मारहाण, नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाळू वाहतुकीचे डंपर अडविल्याचा रागातून नगरसेवक गौरव चौधरी यांनी मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाळू वाहतुकीचे डंपर अडविल्याचा रागातून नगरसेवक गौरव चौधरी यांनी मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद महसूल विभागाच्या पथकातील तलाठी निशा पावरा यांनी शहर पोलिसात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक चौधरी यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, जातिवाचक शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार, ५ जून रोजी दुपारी ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्या मालकीचे वाळू वाहतूक करणारे डंपर तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या पथकाने अडविले. त्यावेळी गौरव चौधरी तेथे आले. त्यांनी पथकाशी वाद घातला. वादातून पथकातील तलाठी महिला निशा पावरा यांना धक्काबुकी करून खाली पाडले, तसेच कानशिलात मारून जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तलाठी पावरा यांनी फिर्यादीत केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक गौरव चौधरी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे करीत आहेत.

दरम्यान, पथकाने वाळू डंपर अडवून चालकाकडून ५० हजारांची मागणी केल्याचा आरोप नगरसेवक चौधरी यांनी केला आहे. ते देखील पोलिसात फिर्याद देणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.