बामखेडा येथे स्वॅब तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:14 IST2021-01-24T04:14:58+5:302021-01-24T04:14:58+5:30
शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आरोग्य, ...

बामखेडा येथे स्वॅब तपासणी
शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत विभागाकडून संबंधित गावांना, व्यक्तींना वेळोवेळी सूचना देऊन परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मागील आठवड्यात बामखेडा त.त. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यावेळीही कोरोना नियमांचे सर्व पालन केले गेले. परंतु, तरीही वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता खबरदारी म्हणून बामखेडा त.त. गावात तीन दिवस ग्रामस्थांनी सर्व व्यवहार स्वयंघोषित बंद ठेवले होते. शनिवारी आरोग्य विभागाने बामखेडा त.त. येथे शिबिर घेऊन नागरिकांची तपासणी केली असून, लक्षणे असलेले व नसलेल्या ३४ जणांचे स्वॅब घेण्यात आले. आरोग्य तपासणीवेळी वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय मोहने, पोलीस पाटील डॉ. योगेश चौधरी, समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पावरा, गिरीश जावरे, संदीप राठोड, एस. एस. साळवे, संजय परदेशी, बामखेडा उपकेंद्राच्या आरोग्यसेविका अलका मराठे, चावडा, आदी उपस्थित होते.