महिलांवरील अत्याचारावर पथनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:42 PM2020-02-19T12:42:12+5:302020-02-19T12:42:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ‘महिलांवर वाढता अत्याचार ...

Street drama on the oppression of women | महिलांवरील अत्याचारावर पथनाट्य

महिलांवरील अत्याचारावर पथनाट्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ‘महिलांवर वाढता अत्याचार (माणुसकीला काळं फासणारा)’ या विषयावर शहादा शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून जनजागृती केली.
या वेळी जि.प.च्या आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री पाटील, माधवी पाटील, तहसीलदार मिलिंद कुळकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी पी.टी. सपकाळे, पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, सचिव हेमंत पाटील, डॉ.बी.डी. पटेल, डॉ.वसंत पाटील, नगरसेवक संजय साठे, मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी. पवार उपस्थित होते.
शहरातील सप्तशृंगी माता मंदिर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती चौक व जनता चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे ‘महिलांवर वाढता अत्याचार (माणुसकीला काळं फासणारा)’ या विषयावर जनजागृती केली. सध्या महिलांवर वाढत चाललेले अत्याचार तसेच महिलांवर कशा पद्धतीने हल्ले केले जातात याचे एक उदाहरण म्हणून अ‍ॅसिड हल्ला कसा केला जातो याचे सादरीकरण केले. तसेच अशाप्रकाराचे हल्ले बंद व्हावेत यासाठी या विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
पथनाट्याच्या शेवटी प्रतिज्ञा घेतली व त्यात सर्वांनी महिलांचा आदर करणे, हल्ले करायचे नाही, चांगली वर्तणूक करायला हवी, कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ देणार नाही. ‘सोचेगा इंडिया, समझेगा इंडिया, तभी तो बढेगा इंडिया’ असा संदेश विद्यार्थ्यांकडून पथनाट्याच्या माध्यमातून देण्यात आला. समारोपप्रसंगी डॉ.बी.डी. पटेल, डॉ.वसंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.एच.पी. सूर्यवंशी तर आभार प्रा.नेत्रदीपक कुवर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Street drama on the oppression of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.